Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

2023 Audi : 2023 ऑडी Q5 Limited Edition मध्ये काय आहे खास ? ‘या’ 5 गोष्टी कारला बनवतात खूप आकर्षक; जाणून घ्या

2023 ऑडी Q5 लिमिटेड एडिशन खास Mythos ब्लॅक कलरमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ही एक अतिशय स्टायलिश कार आहे.

0

2023 Audi : भारतीय बाजारात अनेक नवनवीन कार लॉन्च होत असतात. सध्या लोक अनेक महागड्या कार खरेदी करत आहेत, कारण या कारमध्ये त्यांना मिळणारे फीचर्स हे खूप आकर्षक असतात.

अशा प्रकारे जर तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण 2023 ऑडी Q5 लिमिटेड एडिशन 18 नोव्हेंबर रोजी विशेष अपडेट्ससह लॉन्च करण्यात येत आहे.

या खास लक्झरी कारला आणखी खास बनवण्यासाठी कंपनीने यामध्ये अनेक अपडेट्स केले आहेत. 2023 ऑडी Q5 लिमिटेड एडिशनमध्ये काय खास आहे आणि त्यात किती बदल करण्यात आले आहेत ते एकूण 5 पॉइंट्समध्ये समजून घेऊ शकता.

2023 ऑडी Q5 लिमिटेड एडिशन भारतीय बाजारपेठेत 60.72 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीला लॉन्च करण्यात येत आहे. नेहमीच्या मॉडेलच्या तुलनेत अधिक खास दिसते.

कारमधील नवीन बदल

Audi Q5 लिमिटेड एडिशन खास Mythos ब्लॅक कलरमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. हा एक खास रंग असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ब्लॅक कलर वर ग्रिलला एक ऑडी लोगोसह Q5 बॅजिंग दिसत आहे. ऑडी लिमिटेड एडिशनला ब्लॅक रूफ रेल आणि विंडो बेल्टलाइनसाठी ब्लॅक फिनिश देखील मिळते.

लक्झरी डिझाइन

लिमिटेड एडिशन Q5 निवडणाऱ्या ग्राहकांना SUV साठी एंट्री LED ऑडी रिंग, स्टेनलेस स्टील पेडल कव्हर्स, डायनॅमिक हब कॅप्स, ORVM हाऊसिंग इन सिल्व्हर आणि ऑडी व्हॉल्व्ह कॅप्स यासह विविध ऍक्सेसरीजमधून निवड करण्याचा अधिकार असेल. जे कारला आणखी आलिशान बनवेल.

लक्झरी वैशिष्ट्ये जाणून घ्या

या SUV ला 3-झोन क्लायमेट कंट्रोल, 10.1-इंच टचस्क्रीन सिस्टम, 12.3-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, रिव्हर्सिंग कॅमेरा आणि 30 अॅम्बियंट लाइट्स मिळतात, ज्यामुळे संपूर्ण वाहन आतून अधिक सुंदर बनते.

रात्रीच्या वेळी सभोवतालच्या प्रकाशाचा सर्वोत्तम आनंद घेतला जातो. याशिवाय, फीचर्सच्या बाबतीत, यात वायरलेस फोन चार्जिंग, ड्रायव्हर साइडसाठी मेमरी फंक्शनसह पॉवर्ड फ्रंट सीट्स, आठ एअरबॅग्ज आणि 19-स्पीकर 755W Bang & Olufsen म्युझिक सिस्टम मिळते. अशा प्रकारे तुमच्यासाठी ही एक सर्वोत्तम कार आहे.