Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

32 जबरदस्त सेफ्टी फीचर्स आणि पावरफुल इंजिनसह अवघ्या 10 लाखात लॉन्च झाली ‘ही’ डॅशिंग कार। 2023 Kia Seltos Facelift

आज Kia ने मोठी घोषणा करत 2023 Kia Seltos Facelift च्या किमती जाहीर केल्या आहे. आम्ही तुम्हाला सांगतो जर तुम्ही 2023 Kia Seltos Facelift खरेदी करण्याची तयारी करत असाल तर यासाठी तुम्हाला एक्स-शोरूम किंमत 10,89,999 ते 19,99,900 रुपये मोजावी लागणार आहे. 

0

2023 Kia Seltos Facelift:  भारतीय बाजारपेठेमध्ये ऑटो कंपनी Kia ने काही दिवसापूर्वीच एक मोठी धमाका करत आपली नवीन कार 2023 Kia Seltos Facelift  सादर केली होती मात्र कंपनीने या डॅशिंग कारच्या किमतीबद्दल कोणती ही माहिती दिली नव्हती.

मात्र आज Kia ने मोठी घोषणा करत 2023 Kia Seltos Facelift च्या किमती जाहीर केल्या आहे. आम्ही तुम्हाला सांगतो जर तुम्ही 2023 Kia Seltos Facelift खरेदी करण्याची तयारी करत असाल तर यासाठी तुम्हाला एक्स-शोरूम किंमत 10,89,999 ते 19,99,900 रुपये मोजावी लागणार आहे.  ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कारमध्ये कंपनीने 32 सेफ्टी फीचर्स देखील दिले आहे. चला मग जाणून घेऊया 2023 Kia Seltos Facelift बद्दल सविस्तर माहिती.

नवीन सेल्टोस फेसलिफ्ट ADAS (Advanced Driver Assistance System) फीचर्सने सुसज्ज आहे. यासोबतच यात पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल झोन ऑटोमॅटिक एसी आणि 10.25 इंचाचा सीमलेस ड्युअल डिस्प्ले आहे जो अनेक फीचर्सनी युक्त आहे. यात टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि सेंटर कन्सोलवर पूर्णपणे डिजिटल टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा समावेश आहे.

याशिवाय यात 18-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. याशिवाय, कारमध्ये पॉवर-अ‍ॅडजस्टेबल व्हेंटिलेटेड सीट्स, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग, एलईडी साउंड मोड लाइटसह अॅम्बियंट लाइटिंग, एअर प्युरिफायर आणि चांगल्या आवाजासाठी 8-स्पीकरसह प्रीमियम बोस ऑडिओ सिस्टम आहे.

2023 Kia Seltos Facelift इंजिन आणि पॉवर

नवीन Kia Seltos फेसलिफ्टमध्ये तीन इंजिन आणि पाच ट्रान्समिशन पर्याय आहेत. यात नवीन 1.5 लीटर 4 सिलेंडर टर्बो GDI पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 160 पीएस पॉवर आणि 253 एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6 स्पीड iMT आणि 7 स्पीड DCT पर्यायाने सुसज्ज आहे. याशिवाय, आणखी 1.5-लिटर 4-सिलेंडर प्रगत स्मार्टस्ट्रीम सामान्य पेट्रोल इंजिन देखील यामध्ये देण्यात आले आहे, जे 115 पीएस पॉवर आणि 144 एनएम टॉर्क देते. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल (6MT) आणि IVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते.

Kia Seltos Facelifit
 

तिसरे इंजिन, याशिवाय, 1.5 लीटर 4 सिलेंडर रिफाइंड CRDi VGT डिझेल इंजिन पर्याय देखील देण्यात आला आहे. हे इंजिन 116 पीएस पॉवर आणि 250 एनएम टॉर्क देते. हे 6iMT आणि 6AT गिअरबॉक्ससह ट्यून केलेले आहे. सुरक्षिततेसाठी, यात 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल-स्टार्ट असिस्ट आणि हिल-डिसेंट कंट्रोल यांसारखी फीचर्स आहेत.

2023 Kia Seltos Facelift सनरूफ फीचर्ससह सुसज्ज

त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना लक्षात घेऊन,  2023 Kia Seltos Facelift  पॅनोरॅमिक सनरूफ देत आहे. त्याच्या सध्याच्या मॉडेलला फक्त सिंगल-पेन युनिट मिळते. पॅनोरॅमिक सनरूफ या कारला एक वेगळी ओळख देईल. यामुळे जर तुम्ही नवीन एसयूव्ही कार खरेदी करण्याची तयारी करत असाल तर  2023 Kia Seltos Facelift तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय ठरू शकते.