Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

360 Degree Camera Cars : मस्तच! ट्रॅफिकमध्ये सहज चालवा 360 डिग्री कॅमेऱ्याने सुसज्ज असलेल्या ‘या’ स्वस्त कार, किंमत 9 लाखांपासून सुरू

ट्राफिकमध्ये कार चालवताना किंवा पार्किंग करताना सतत मागे पुढे पाहावे लागते. मात्र जर तुम्ही 360 डिग्री कॅमेऱ्याने सुसज्ज असलेली कार खरेदी केली तर तुम्ही सहज कार पार्क करू शकता.

0

360 Degree Camera Cars : भारतीय ऑटो बाजारात सर्वोत्तम फीचर्स असलेल्या कार उपलब्ध आहेत. तसेच कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन कारमध्ये प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज फीचर्स दिले जात आहेत. त्यामुळे कारमध्ये अनेक नवनवीन फीचर्स जोडले जात आहेत.

सध्या अनेक कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा दिला जात आहे. त्यामुळे कार पार्किंग करताना आणि ट्राफिकमध्ये चालवताना याची खूप मदत होते. कार चालवताना तुम्हाला सतत आरशात देखील पाहावे लागणार नाही.

कारमध्ये आरामात तुम्ही स्क्रीनवर आजूबाजूचा परिसर पाहू शकता. मात्र 360 डिग्री कॅमेरा हे वैशिष्ट्ये कारच्या टॉप मॉडेलमध्येच दिले जात आहे. तुम्हीही कमी बजेटमध्ये 360 डिग्री कॅमेराने सुसज्ज कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खालील कार उपलब्ध आहेत.

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स कारमध्ये देखील 360 डिग्री कॅमेराचे वैशिष्ट्य देण्यात आले आहे. कारच्या टॉप व्हेरिएंट अल्फामध्ये 360 डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 11.49 लाख रुपये आहे. या कारचे एकूण सिग्मा, डेल्‍टा, डेल्‍टा+, झेटा आणि अल्फा असे ५ व्हेरियंट बाजारात उपलब्ध आहेत.

मारुती सुझुकी बलेनो

तुम्हालाही कमी बजेटमध्ये 360 डिग्री कॅमेरा फीचर असलेली कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बाजारात मारुती बलेनो कार उपलब्ध आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 9.33 लाख रुपये आहे. तुम्ही देखील १० लाख रुपयांच्या बजेटमध्ये ही स्वस्त आणि उत्कृष्ट फीचर्स असलेली कार खरेदी करू शकता.

मारुती सुझुकी ब्रेझा

मारुती सुझुकीच्या ब्रेझा एसयूव्ही कारमध्ये देखील 360 डिग्री कॅमेराची सुविधा दिली जात आहे. ही कार सध्या सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही कार ठरली आहे. भारतीय बाजारपेठेत या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या कारचे एकूण LXI, VXI, ZXI आणि ZXI+ अशी ४ व्हेरियंट उपलब्ध आहेत. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 12.48 लाख रुपये आहे.

निसान मॅग्नाइट

निसान मॅग्नाइट या स्वस्त आणि बजेट कारमध्ये देखील 360 डिग्री कॅमेराची सुविधा दिली जात आहे. या कारच्या टॉप व्हेरियंटमध्ये ही सुविधा दिली गेली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 8.59 लाख रुपये आहे.