Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Hyundai Verna Discount Offer : देशातील सर्वात सुरक्षित सेडान कारवर मिळतोय 45 हजारांचा डिस्काउंट, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

या महिन्यात कार खरेदीवर तुम्ही देखील हजारो रुपयांची बचत करू शकता. देशातील सर्वात सुरक्षित सेडान कारवर 45 हजारांचा डिस्काउंट देण्यात येत आहे.

0

Hyundai Verna Discount Offer : सणासुदीच्या काळात सेडान कार खरेदी करण्याचा विचार असेल तर तो अगदी योग्य आहे. कारण अनेक कार निर्मात्या कंपन्यांकडून त्यांच्या शानदार कारवर आकर्षक सूट दिली जात आहे. नोव्हेंबर 2023 या महिन्यात ग्राहकांना ऑफर दिली जात आहे.

तुम्हालाही या ऑफरचा लाभ घेईचा असेल तर तुमच्यासाठी ह्युंदाईची सर्वात सुरक्षित सेडान कार उत्तम पर्याय आहे. कारण ह्युंदाई मोटर्स त्यांच्या Verna या लोकप्रिय सेडान कारवर मोठी सूट देत आहे.

ह्युंदाई Verna किंमत

ह्युंदाई मोटर्सकडून नुकतीच त्यांच्या सर्व कारमध्ये ६ एअरबॅग्स देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ह्युंदाई मोटर्स ६ एअरबॅग्स देणारी पहिली ऑटो कंपनी ठरली आहे. ह्युंदाई मोटर्सच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.90 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 17.38 लाख रुपये आहे.

ह्युंदाई मोटर्सने अलीकडेच त्यांच्या लोकप्रिय Verna कारचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले आहे. या सेडान कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच या कारची लोकप्रियता आणखी वाढवण्यासाठी कंपनीकडून ४५ हजार रुपयांची ऑफर कारवर दिली जात आहे. या ऑफरमध्ये 20,000 रुपयांची रोख सूट, 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

ह्युंदाई Verna सेडान कारमध्ये जबरदस्त फीचर्स

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या Verna सेडान कारमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात येत आहेत. या कारला ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे. कारमध्ये ६ एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत.

कारच्या टॉप मॉडेलमध्ये ADAS सुरक्षा वैशिष्ट्याचा समावेश आहे. TPMS, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, फ्रंट पार्किंग सेन्सर, ऑल व्हील डिस्क ब्रेक अशी सुरक्षा वैशिष्ट्ये कारमध्ये उपलब्ध आहेत.

ह्युंदाई Verna इंजिन

ह्युंदाई Verna कारमध्ये 1.5-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 115 HP पॉवर जनरेट करते. तसेच दुसरे 1.5 लीटर टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन दिले आहे जे 160 115 HP पॉवर जनरेट करते.

ह्युंदाई Verna

कारमध्ये 10.25-इंच पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, त्याच आकाराच्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह ही कार लाँच करण्यात आली आहे. सेडानला लोअर आणि मिड व्हेरियंटमध्ये ड्युअल-टोन ब्लॅक आणि ऑफ-व्हाइट इंटीरियर थीम देण्यात आली आहे.