Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

7 Seater Cars India : मोठ्या फॅमिलीसाठी या आहेत स्वस्तात मस्त डॅशिंग 7 सीटर कार, 10 लाखात मिळतात जबरदस्त फीचर्स

तुम्हीही तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मारुती सुझुकी ते महिंद्रापर्यंतच्या कार उपलब्ध आहेत.

0

7 Seater Cars India : मोठ्या फॅमिलीसाठी नवीन कार खरेदी करताना अनेकजण ७ सीटर कारचा पर्याय निवडत असतात. बाजारात अनेक कंपन्यांच्या ७ सीटर कार उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती देखील खूप जास्त आहेत. पण काही ७ सीटर कार १० रुपयांपेक्षा स्वस्तात उपलब्ध आहेत.

७ सीटर कारमुळे मोठ्या फॅमिलीतील लोक सहज आरामात प्रवास करू शकतात. या ७ सीटर कारमध्ये अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच मायलेजच्या बाबतीत देखील या कार दमदार कामगिरी करतात.

१० लाखांपेक्षा स्वस्तात मिळतात खालील ७ सीटर कार

मारुती सुझुकी एर्टिगा

मारुती सुझुकी एर्टिगा ७ सीटर कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एर्टिगा देशातील सर्वाधिक लोकप्रिय ७ सीटर कार आहे. ७ सीटर कारमध्ये तसेच सर्वाधिक विकली जाणारी कार आहे.

या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.35 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.79 लाख रुपये आहे. कारमध्ये सीएनजी पर्याय देखील ऑफर करण्यात आला आहे. एर्टिगा कारमध्ये 1.5L पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 103 PS पॉवर आणि 137 NM टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

महिंद्रा बोलेरो

महिंद्रा बोलेरो कार देखील तुमच्यासाठी ७ सीटर कार म्हणून सर्वोत्तम पर्याय आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.53 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.48 लाख रुपये आहे.

कारमध्ये शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे जे 75 PS च्या पॉवर आणि 210 NM टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. AUX आणि USB कनेक्टिव्हिटी फीचरद्वारे स्मार्टफोनशी कनेक्ट करून डिस्प्ले नियंत्रित करू शकता.

Renault Triber

Renault Triber कार ही देखील तुमच्यासाठी 7 सीटर कार म्हणून सर्वोत्तम पर्याय आहे. या कारची किंमत देखील १० लाख रुपयांपेक्षा कमी आहे. कारमध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 72 PS च्या पॉवरसह 96 Nm कमाल टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

Renault Triber कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.92 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.51 लाख रुपये आहे. Triber कार तुमच्यासाठी सर्वात स्वस्त ७ सीटर कारचा पर्याय आहे.