Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

7 Seater CNG Cars In India : मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहेत या CNG 7 सीटर कार! देतात 27 Kmpl मायलेज, किंमत फक्त 7.46 लाख रुपयांपासून सुरू

तुम्हालाही मोठ्या कुटुंबासाठी दमदार मायलेज देणाऱ्या सीएनजी ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी मारुतीच्या कार सर्वोत्तम पर्याय आहेत.

0

7 Seater CNG Cars In India : मोठ्या फॅमिलीसाठी नवीन कार खरेदी करत असताना अनेकजण ७ सीटर कारचा पर्याय निवडत असतात. बाजारात अनेक कंपन्यांच्या ७ सीटर कार उपलब्ध आहेत. या ७ सीटर कारमध्ये कार उत्पादक कंपन्यांकडून सीएनजी पर्याय देखील दिला जात आहे.

तुम्हीही बाजारात सीएनजी ७ सीटर कार शोधत असाल तर तुमच्यासाठी अनेक कंपन्यांच्या कार उपलब्ध आहेत. या ७ सीटर सीएनजी कार 27 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. तसेच या सीएनजी कारच्या किमती देखील खूपच कमी आहेत.

मारुती xl6

मारुती सुझुकीकडून त्यांच्या अनेक स्वस्त कार ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद या कारला मिळत आहे. मारुती सुझुकीची स्वस्त ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मारुती xl6 तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.

मारुतीच्या xl6 या कारच्या Zeta MT व्हेरियंटमध्ये सीएनजी पर्याय उपलब्ध आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 14.56 लाख रुपये आहे. मारुती xl6 ही कार सीएनजीमध्ये २६ Kmpl मायलेज देण्यास सक्षम असेल.

मारुती एर्टिगा

मारुती सुझुकीच्या एर्टिगा कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुती सुझुकीची एर्टिगा ही सर्वाधिक विक्री होणारी ७ सीटर कार आहे. एर्टिगा कार VXI (O) आणि ZXI (O) या दोन मॉडेल्समध्ये सीएनजी पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या कारच्या VXI (O) या सीएनजी मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.41 लाख रुपये आहे तर ZXI (O) या सीएनजी मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.66 लाख रुपये आहे. ही कार 26 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहेत.

मारुती इको

मारुती सुझुकीची इको ७ सीटर कार देखील एक उत्तम पर्याय आहे. ही कार ५ आणि ७ सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. भारतात या कारची सर्वाधिक मागणी आहे. कंपनी फिटेड सीएनजी किट या कारमध्ये देण्यात येत आहे. या कारच्या सीएनजी मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.46 लाख रुपये आहे. ही कार 27 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.