Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Mileage Bike : 70 Kmpl मायलेज आणि किंमत फक्त 80 हजार! शून्य रुपयांत घरी आणा ही स्टायलिश बाईक

बाईक खरेदी करण्यासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही शून्य रुपयांमध्ये हिरोची स्टायलिश बाईक घरी आणू शकता.

0

Best Mileage Bike : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे अनेकजण दमदार मायलेज देणाऱ्या बाईक खरेदी करत आहेत. तुम्हालाही कमी किमतीमध्ये दमदार मायलेज बाईक खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बाजारात हिरोची उत्कृष्ट बाईक उपलब्ध आहे.

बाईक खरेदी करण्यासाठी तुमचेही बजेट कमी असेल तर तुम्ही देखील अगदी शून्य रुपयांमध्ये शानदार बाईक घरी आणू शकता. हिरो दुचाकी बाईक कंपनीकडून त्यांच्या शानदार मायलेज मायलेज देणाऱ्या बाईक सादर करण्यात आल्या आहेत.

हिरो दुचाकी कंपनीची स्प्लेंडर बाईक तुम्ही अवघ्या शून्य रुपयांच्या डाउनपेमेंटवर घरी आणू शकता. त्यामुळे कमी बजेटमध्ये बाईक खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होईल. स्प्लेंडर बाईकचा उत्कृष्ट लूक आणि दमदार मायलेज ग्राहकांना आकर्षित करत आहे.

हिरो स्प्लेंडर इंजिन

हिरो स्प्लेंडर बाईकमध्ये जबरदस्त इंजिन देण्यात आले आहे. बाईकमध्ये 97.2 cc, एअर-कूल्ड 4 स्ट्रोक सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8.02 bhp पॉवर आणि 8.05 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. स्प्लेंडर बाईक 75 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

हिरो स्प्लेंडर किंमत

हिरो कंपनीकडून स्प्लेंडर बाईकचे 4 मॉडेल ऑफर करण्यात आले आहे. बाईकची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 73061 रुपयांपासून सुरु हते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 84413 रुपयांपर्यंत जाते. बाईकमध्ये सेल्फ स्टार्ट, अॅलॉय व्हील, डिजिटल डिस्प्ले, राइड अॅनालॉग अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

हिरो स्प्लेंडर बाईक EMI प्लॅन

हिरो स्प्लेंडर बाईक खरेदी कारण्यासाठी आता तुमच्याकडे पैसे नसतील तरीही बाईक घरी आणू शकता. बाईकवर EMI पर्याय देण्यात आला आहे. ही बाईक ऑन रोड 86,962 रुपयांना मिळेल. 5 वर्षांसाठी 9 टक्के दराने बैकेवर कर्ज दिले जाईल.

कर्जाची परतफेड करण्यासाठी ग्राहकांना दरमहा 1,805 रुपये EMI भरावा लागेल. कर्जावर व्याज म्हणून तुमच्याकडून 21,349 रुपये घेतले जातील. 5 वर्षांत तुम्हाला एकूण 1,08,311 रुपये भरावे लागतील.