Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

ADAS Safety Feature Cars : या आहेत भारतातील ADAS सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेल्या कार! खरेदी करण्यापूर्वी पहा यादी

भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये अनेक कंपन्यांच्या जबरदस्त सुरक्षा वैशिष्ट्ये असलेल्या कार उपलब्ध आहेत. तसेच तुम्ही देखील नवीन कार खरेदी करत असाल तर ADAS सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेली कारच खरेदी करा.

0

ADAS Safety Feature Cars : आजकाल रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असल्याने अनेकजण नवीन कार खरेदी करत असताना सुरक्षा फीचर्स असलेल्या कारचा पर्याय निवडत आहेत. तसेच अनेक कंपन्यांकडून नवीन कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देण्यात येत आहेत.

कारच्या सुरक्षा वैशिष्ट्यांपैकी सर्वात महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे ADAS (Advanced Driver Assistance System) होय. अनेक कंपन्यांकडून त्यांच्या नवीन कारमध्ये ADAS हे सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात येत आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कार निर्मात्या कंपनीकडून कारमध्ये कार कंपन्या सेफ्टी सूट अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन अशी फीचर्स देण्यात येत आहेत.

तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ADAS हे सुरक्षा वैशिष्ट्ये असलेलीच कार खरेदी करा. जाणून घेऊया भारतातील ADAS हे सुरक्षा वैशिष्ट्ये असलेल्या कार….

होंडा सिटी

होंडा सिटी या कारमध्ये अनके सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात येत आहेत. कारमध्ये कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग, रोड डिपार्चर मिटिगेशन, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटो हेडलॅम्प बीम अॅडजस्ट फीचर्स मिळतात. तसेच ADAS हे सुरक्षा वैशिष्ट्ये देखील देण्यात येत आहे.

या कारचे V, VX आणि ZX असे पेट्रोल मॉडेल सध्या ऑटो बाजारात उपलब्ध आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत 11,57,000 पासून सुरू होते. त्यामुळे ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये असलेली ही कार देखील तुम्ही खरेदी करू शकता.

Hyundai Verna

ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये असलेली कार शोधत असाल तर तुमच्यासाठी Hyundai Verna ही कार सर्वोत्तम पर्याय आहे. या कारमध्ये फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ब्लाइंड-स्पॉट कोलिजन वॉर्निंग, लेन किपिंग असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, स्टॉप अँड गो स्मार्ट क्रूझ कंट्रोल आणि लेन फॉलोइंग असिस्ट वैशिष्ट्ये देण्यात येत आहेत. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 14.65 लाख रुपये आहे.

MG Astor

MG Astor या कारमध्ये देखील ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात येत आहे. या कारची एक्स शोरूम किंमत १७ लाख रुपयांपासून सुरु होते. या कारच्या टॉप व्हेरिएंटमध्ये अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग यांसारख्या वैशीष्ट्ये देखील देण्यात येत आहेत.

Tata Harrier

टाटा मोटर्सच्या कार सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी ओळखल्या जातात. Tata Harrier या कारमध्ये देखील ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात येत आहे. या कारमध्ये तुम्हाला 6 एअरबॅग पाहायला मिळतील. तसेच कारमध्ये फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग, ट्रॅफिक साइन रेकग्निशन, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन चेंज अलर्ट, हाय बीम असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट आणि रिअर कोलिजन वॉर्निंग ही वैशिष्ट्ये देण्यात येत आहेत.