Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Affordable 7-Seater Cars : 15 लाखांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा या उत्कृष्ट 7 सीटर कार, पहा यादी

मोठ्या फॅमिलीसाठी नवीन कार खरेदी करताना ग्राहक ७ सीटर कारचा पर्याय निवडत आहेत. तुम्हीही ७ सीटर कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मारुती ते महिंद्राच्या कार उपलब्ध आहेत.

0

Affordable 7-Seater Cars : तुम्हालाही तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी ७ सीटर कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बाजारात अनेक ऑटो कंपन्यांच्या उत्तम ७ सीटर कार उपलब्ध आहेत. या ७ सीटर कार खरेदी करून तुम्ही देखील कुटुंबासोबत एकत्रित प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

खालील ७ सीटर का तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी उत्तम आहेत

मारुती सुझुकी एर्टिगा

मारुती सुझुकीची एर्टिगा ७ सीटर कार देशातील लोकप्रिय फॅमिली कार आहे. या कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.64 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.08 लाख रुपये आहे. कारच्या सीएनजी व्हेरियंटला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Citroen C3 Aircross

Citroen कार उत्पादक कंपनीकडून त्यांची C3 Aircross ७ सीटर कार ग्राहकांना कमी बजेटमध्ये उपलब्ध करून दिली आहे. ही कार फक्त पेट्रोल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.54 लाख रुपये आहे.

Toyota Rumion

टोयोटा कार कंपने त्यांची एर्टिगा कारवर आधारित Rumion ७ सीटर कार सादर केली आहे. या कारमध्ये कंपनीकडून पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.29 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.68 लाख रुपये आहे.

Kia Carens

किआ कार उत्पादक कंपनीची Carens ७ सीटर कार देखील तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी उत्तम पर्याय आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.45 लाख रुपये आहे. या कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्याय देण्यात आला आहे.

महिंद्रा Scorpio-N

महिंद्रा कार उत्पादक कंपनीने त्यांच्या अनेक शक्तिशाली इंजिन असलेल्या ७ सीटर कार सादर केल्या आहेत. तुम्हालाही मोठ्या फॅमिलीसाठी उत्तम ७ सीटर खरेदी करायची असेल तर Scorpio-N पर्याय ऑटो बाजारात उपलब्ध आहे.