Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Affordable 7 Seater Cars : मोठ्या फॅमिलीसाठी या आहेत खिशाला परवडणाऱ्या 7 सीटर कार, किंमतही खुपच कमी…

आजकल अनेकजण नवीन कार खरेदी करत असताना कुटुंबातील सदस्यांनुसार कार खरेदी करत असतात. मोठ्या कुटुंबासाठी सहसा 7 सीटर कारचा पर्याय निवडला जातो.

0

Affordable 7 Seater Cars : देशातील ऑटो बाजाराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ग्राहकांची वाढत्या मागणीमुळे ऑटो बाजारात एकापेक्षा एक दमदार कार सादर केल्या जातात आहेत. मोठ्या फॅमिलीसाठी नवीन कार खरेदी करताना अनेकजण 7 सीटर कारचा पर्याय निवडत असतात.

तुम्हीही तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी ७ सीटर फॅमिली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मारुती सुझुकीपासून किआपर्यंतच्या अनेक कार उपलब्ध आहेत. या कार अगदी कमी बजेटमध्ये उपलब्ध आहेत.

1. रेनॉल्ट ट्रायबर

रेनॉल्ट ट्रायबर ही एक देशातील सर्वात स्वस्त आणि उत्कृष्ट फीचर्स असलेली ७ सीटर कार आहे. या कारमध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 71 bhp पॉवर आणि 96 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT ट्रान्समिशन पर्याय देण्यात आला आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ६.३३ लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ८.९७ लाख रुपये आहे.

2. मारुती एर्टिगा

मारुती सुझुकीच्या एर्टिगा कारला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. देशातील सर्वाधिक विक्री होणार ७ सीटर कार म्हणून एर्टिगाला ओळखले जाते. या कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तसेच कारमध्ये सीएनजी पर्याय देखील देण्यात आला आहे.

कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क-कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडण्यात आले आहे. कारची एक्स शोरूम किंमत 8.64 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.08 लाख रुपये आहे.

3. महिंद्रा बोलेरो निओ

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून मोठ्या फॅमिलीसाठी अनेक कार उपलब्ध दिल्या आहेत. या ७ सीटर कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिंद्रा बोलेरो निओ ही कार देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 9.63 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.14 लाख रुपये आहे. कारमध्ये 1.5-लिटर टर्बो-डिझेल इंजिन देण्यात आले आहे.

4. टोयोटा Rumion

टोयोटाकडून मारुती सुझुकी एर्टिगा कारवर आधारित त्यांची Rumion ७ सीटर कार सादर केली आहे. या कारमध्ये 1.5L पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे सीएनजी पर्यायांमध्ये देखील ऑफर केले जात आहे. मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह ही कार उपलब्ध आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 10.29 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.68 लाख रुपये आहे.

5. किआ Carens

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांची Carens ७ सीटर कार भारतात सादर केली आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10.45 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 18.95 लाख रुपये आहे. कारमध्ये 1.5L NA पेट्रोल, 1.5L टर्बो-पेट्रोल आणि 1.5L टर्बो-डिझेल असे तीन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत.

6. महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक

 

महिंद्रा कंपनीची आणखी स्कॉर्पिओ क्लासिक ७ सीटर कार तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या कारमध्ये 2.2-लिटर टर्बो-डिझेल इंजिन देण्यात आले आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 13.25 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 17.06 लाख रुपये आहे.

7. महिंद्रा स्कॉर्पिओ-एन

महिंद्रा स्कॉर्पिओ-एन ही कार देखील ७ सीटर कारमध्ये उत्तम पर्याय आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 13.26 लाख रुपयेपासून सुरु होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 24.54 लाख रुपयांपर्यंत जाते. कारमध्ये 2.0L टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 2.2L टर्बो-डिझेल इंजिन असे दोन पर्याय देण्यात आले आहेत.