Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Affordable Automatic Cars : टेन्शन नाही! आजच घरी आणा ‘ह्या’ सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार्स

0

Affordable Automatic Cars : जर तुम्ही नवीन कार खरेदीचा विचार करत असाल मात्र तुमचा बजेट कमी असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

आम्ही या लेखात तुम्हाला देशातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार्सबद्दल माहिती देणार आहोत. ज्याचा तुम्ही फायदा घेत अगदी कमी बजेटमध्ये मस्त मस्त फीचर्स आणि जबरदस्त मायलेजसह येणाऱ्या कार्स घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया कमी बजेटमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्वात भारी ऑटोमॅटिक कार्सबद्दल संपूर्ण माहिती.

Maruti S-Presso
कारमध्ये 1.0-लिटर NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे जास्तीत जास्त 65.7bhp पॉवर आणि 89Nm टॉर्क जनरेट करते. यासोबतच 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक (AGS) गिअरबॉक्सचा पर्यायही देण्यात आला आहे. तुम्हाला याचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट 5.76 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत मिळेल.

Maruti Suzuki Alto K10
Maruti Suzuki Alto K10 ही कंपनीची सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार आहे. हे 1.0-लिटर NA पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. जे जास्तीत जास्त 65.7bhp पॉवर आणि 89Nm टॉर्क जनरेट करते. यासोबतच 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक (AGS) गिअरबॉक्सचा पर्यायही देण्यात आला आहे. तुम्हाला याचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट 5.59 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत मिळेल.

Renault Kwid
कारमध्ये 1.0-लिटर NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तुम्हाला याचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट 6.12 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत मिळेल.

Maruti WagonR
यामध्ये तुम्हाला 1.0-लिटर आणि 1.2-लिटर असे दोन इंजिन पर्याय मिळतात. यासोबतच 5-स्पीड एमटी आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही देण्यात आला आहे. तुम्हाला याचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट 6.55 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत मिळेल.

Tata Tiago
हे 1.2-लिटर NA पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 84 bhp ची कमाल पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. यासोबतच 5-स्पीड एमटी आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्यायही देण्यात आला आहे. तुम्हाला याचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट 6.92 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत मिळेल.