Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Affordable automatic cars : उत्तम फीचर्स आणि 25.3 kmpl मायलेज देणाऱ्या ‘या’ आहेत परवडणाऱ्या ऑटोमॅटिक कार, पहा लिस्ट

भारतीय बाजारात अशा काही ऑटोमॅटिक कार आहेत ज्या तुम्ही तुमच्या बजेटमध्ये सहज खरेदी करू शकता. जाणून घ्या सविस्तर.

0

Affordable automatic cars : भारतीय बाजारात अनेक कंपन्यांच्या ऑटोमॅटिक कार उपलब्ध आहेत. त्यापैकी काही कारच्या किमती जास्त आहेत. जर तुम्ही कमी बजेटमध्ये ऑटोमॅटिक कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे.

तुम्ही आता तुमच्या 25 kmpl पेक्षा जास्त मायलेज देणाऱ्या या 5 ऑटोमॅटिक कार खरेदी करू शकता. त्या देखील 6 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत. जर तुम्हाला स्वस्तात या कार खरेदी करायच्या असतील तर ही संधी हातातून जाऊ देऊ नका.

मारुती एस-प्रेसो

मारुतीने आपली एस-प्रेसो ऑटोमॅटिक पर्यायात ऑफर केली आहे. त्याचे VXI प्रकार दोन ट्रिम्सच्या निवडीसह ऑटोमॅटिक ट्रांसमिशनमध्ये कंपनीकडून उपलब्ध करून दिले आहे. तुम्हाला या कारमध्ये एक लिटर क्षमतेचे इंजिन पाहायला मिळेल. किमतीचा विचार केला तर कारची किंमत 5.76 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारचे मायलेज 25.3 kmpl इतके आहे.

मारुती Alto K10

मारुती Alto K10 ही देखील ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध असणारी सर्वात कमी बजेटमध्ये येणारी कार आहे. किमतीचा विचार केला तर या ऑटोमॅटिक मॉडेलची किंमत 5.61 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होत असून ती VXI या ट्रान्समिशनमध्ये येते. कंपनीकडून या कारमध्ये 1-लिटर इंजिन दिली आहे. कारचे मायलेज २५ किलोमीटर प्रति लिटर आहे.

मारुती सेलेरिओ

मारुतीने आता सेलेरियो देखील ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायासह लाँच केली आहे. ही कंपनी या कारमध्ये 1-लिटर 998cc इंजिन देते. कार पेट्रोलसोबतच सीएनजीमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. तर त्याचे VXI आणि ZXI प्रकार स्वयंचलित ट्रांसमिशनमध्ये ऑफर केले आहे. 6.38 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून या कारची किंमत सुरू होत असून कारचे मायलेज 26.68 kmpl आहे.

मारुती वॅगनआर

मारुती वॅगनआर 1.2-लिटर इंजिनसह उपलब्ध आहे. तिचा ऑटोमॅटिक प्रकार VXi ट्रिमपासून सुरू होते. कारची किंमत 6.54 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. मायलेज 25.19 किलोमीटर प्रति लिटर आहे.

Renault Kwid

Renault Kwid च्या दोन व्हेरियंटमध्ये 1.0-लिटर इंजिनसह ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय दिला आहे. किमतीचा विचार केला तर या ऑटोमॅटिक मॉडेलची किंमत 6.12 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. जिचे मायलेज 22 किलोमीटर प्रति लिटर आहे.