Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Affordable Sport Bikes In India : खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये खरेदी करा सुझुकी ते यामाहा पर्यंतच्या या स्टायलिश स्पोर्ट बाईक्स, पहा यादी

तुमचेही कमी बजेटमध्ये शानदार स्पोर्ट बाईक खरेदी करण्याचे स्वप्न असेल तर ते सहज पूर्ण होऊ शकते. सुझुकी ते यामाहा पर्यंतच्या २ लाखांपेक्षा कमी किमतीतील स्पोर्ट बाईक्स बाजारात उपलब्ध आहेत.

0

Affordable Sport Bikes In India : भारतीय दुचाकी ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या स्वस्त शानदार स्पोर्ट बाईक्स उपलब्ध आहेत. तसेच अनेक नवनवीन स्पोर्ट बाईक्स देखील बाजारात दाखल होत आहेत. काही स्पोर्ट बाईकच्या किमती देखील जास्त आहेत.

स्पोर्ट बाईक खरेदी करण्याचे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. मात्र स्पोर्ट बाईकच्या किमती जास्त असल्याने अनेकांना त्या खरेदी करता येत नाहीत. पण तुमचे बजेट २ लाखांपेक्षा कमी असेल तर सुझुकी ते यामाहा पर्यंतच्या शक्तिशाली इंजिन असलेल्या स्पोर्ट बाईक सहज खरेदी करू शकता.

Suzuki Gixxer SF

सुझुकी दुचाकी निर्मात्या कंपनीची Gixxer SF स्पोर्ट बाईक तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 1.36 लाख रुपये आहे. Gixxer SF ही देशात सर्वाधिक विकली जाणारी स्पोर्ट बाईक आहे.

बाईकमध्ये 155 सीसी सिंगल सिलेंडर फ्युएल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 13.4 bhp पॉवर आणि 13.8 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकचे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

Hero Xtreme 200S 4V

हिरो ही देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी आहे. हिरोची Xtreme 200S 4V स्पोर्ट बाईक तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. बाईकची एक्स शोरूम किंमत 1.43 लाख रुपये आहे. बाईकमध्ये 199.6 सीसी सिंगल-सिलेंडर आणि ऑइल-कूल्ड 4 व्हॉल्व्ह इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 18.9 bhp ची पॉवर आणि 17.35 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सशी जोडले आहे.

Yamaha R15

यामाहा दुचाकी निर्मात्या कंपनीच्या सर्वच स्पोर्ट बाईकला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामाहाची R15 स्पोर्ट बाईक तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. R15S बाईकची एक्स शोरूम किंमत 1.66 लाख रुपये आहे तर R15 V4.0 बाईकची एक्स शोरूम किंमत 1.82 लाख रुपये आहे. 155cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, SOHC, चार-व्हॉल्व्ह इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्सशी जोडले आहे.

KTM RC 125

उत्कृष्ट फीचर्स आणि स्टायलिश लूक असलेली स्पोर्ट बाईक खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बाजारात KTM RC 125 बाईक उपलब्ध आहे. बाईकची एक्स शोरूम किंमत 1.89 लाख रुपये आहे. बाईकमध्ये 124 सीसी सिंगल सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे जे 6 स्पीड गिअरबॉक्सशी जोडले आहे.