Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Bajaj Auto : बजाज ऑटोची मोठी तयारी ! नवीन पल्सर आणि सीएनजी बाइक बाजारात आणणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स काय असतील…

भारतीय बाजारात बजाज ऑटो हे नाव खूप मोठे आहे. आता ही कंपनी बाजारात सीएनजी बाइक आणण्याची तयारी करत आहे.

0

Bajaj Auto : भारतीय बाजरात आघाडीवर असणारी कंपनी बजाज ऑटो देशांतर्गत बाजारपेठेत आपल्या वाहन पोर्टफोलिओचा मोठा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कारण आता कंपनीने काही मोठे संकेत दिले आहेत.

कारण मिळालेल्या माहितीनुसार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी नवीन बजाज पल्सर रेंज तसेच 100 सीसी सेगमेंटमधील सीएनजी बाइकचे संकेत दिले. तसेच यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सीएनजी वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची विनंती केली आहे.

भारतीय बाजारात तरुणांना वेड लावणारी बाइक ही बजाज पल्सर ही आहे. अजूनही देशात मोठ्या प्रमाणात पल्सर बाईकचे चाहते आहेत. कंपनीने एक आनंदाची बातमी दिली आहे. कारण आजपर्यंतची सर्वात मोठी पल्सर बाइक कंपनी लॉन्च करणार आहे.

यामागे बजाज ऑटोचे सेगमेंटमध्ये नंबर वन बनण्याचे उद्दिष्ट आहे आणि हे लक्षात घेऊन कंपनी पल्सर रेंजमधील नवीन मॉडेलसह 6 अपग्रेड्स देण्याची योजना आखत आहे.

नवीन बजाज पल्सर कशी असेल?

मागील काही काळात पल्सर हे नाव खूप चर्चेत होते. बजाज पल्सरने देशांतर्गत बाजारात प्रवेश केल्यापासून ही बाईक तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या बाईकने सुरुवातीच्या काळात निर्माण केलेल्या लोकप्रियतेचा फायदा मोठ्या प्रमाणात कंपनीला झाला आहे. त्यामुळेच कदाचित राजीव बजाज म्हणाले की “आम्हाला वाटते की आमच्याकडे एक चांगले उत्पादन आहे, आणि ते या आर्थिक वर्षात सादर केले जाईल.” मात्र ते नवीन बजाज पल्सर असेल अशी शक्यता आहे.

मात्र, सर्वात मोठ्या पल्सरबाबत अद्याप कोणतीही तांत्रिक माहिती शेअर करण्यात आलेली नाही. पण जर आपण पल्सर रेंजवर नजर टाकली तर कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 250cc पर्यंतच्या पल्सर उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत कंपनी 400 सीसीची बजाज पल्सर सादर करू शकते.

बजाज सीएनजी बाइक

बजाज ऑटोच्या सीएनजी बाईकबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. जवळजवळ 17 वर्षांपूर्वी, म्हणजे एप्रिल 2006 मध्ये, राजीव बजाज यांनी सूचित केले होते की कंपनी नवीन उत्पादनावर काम करत आहे. पेट्रोलशिवाय सीएनजीवरही चालणार आहे.

या बाईकमध्ये दोन इंधन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आतापर्यंत हे उत्पादन बाजारापासून दूर राहिले आहे. आता सीएनजी वाहनांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी होत असताना बजाज ऑटो सीएनजी बाईकची तयारी करत आहे की काय, या चर्चेला पुन्हा एकदा जोर आला आहे.