Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Bajaj Chetak EV Scooter : बजाजने लॉन्च केली अपडेटेड चेतक EV स्कूटर ! पहा किंमत आणि रेंज

0

Bajaj Chetak EV Scooter : देशातील दुचाकी मार्केटमध्ये बजाज दुचाकी कंपनीकडून त्यांची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर अनेक दिवसांपूर्वीच लॉन्च केली आहे. मात्र आता कंपनीकडून त्यांच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मोठे बदल करत पुन्हा एकदा लॉन्च केली आहे.

भारतीय ऑटो मार्केटमध्ये बजाजने त्यांची अपडेटेड चेतक इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. अपडेटेड चेतक इलेक्ट्रिक स्कूटर अर्बन आणि प्रीमियम या दोन व्हेरियंटमध्ये विकली जाणार आहे.

नवीन चेतक इलेक्ट्रिक स्कूटर किंमत

नवीन चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच स्कूटरच्या नवीन किमती देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. बजाजच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या अर्बन व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 1,15,001 लाख रुपये ठेवण्यात आली आहे तर प्रीमियम व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 1,35,463 रुपये ठेवण्यात आली आहे.

2024 बजाज चेतक मध्ये काय खास आहे?

बजाज इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. सिंगल चार्जमध्ये अपडेटेड चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचे अर्बन व्हेरियंट 113 किमी रायडींग रेंज देण्यास सक्षम आहे. स्कूटरची बॅटरी चार्ज होण्यासाठी 4 तास 50 मिनिटे लागतात.

तसेच अपडेटेड चेतक प्रीमियम व्हेरियंट सिंगल चार्जमध्ये 108 किमी रेंज देते. स्कूटरचा टॉप स्पीड 63 किमी प्रति तास आहे. प्रीमियम व्हेरियंट स्कूटरची बॅटरी चार्ज होण्यासाठी 3 तास 50 मिनिटे लागतात. बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, संगीत नियंत्रणे, कॉल अलर्ट आणि डिस्प्ले थीम असे फीचर्स देण्यात आले आहेत.

कंपनीने काय म्हटले?

बजाज दुचाकी निर्मात्या कंपनीकडून सांगणायत आले आहे की, आधुनिक काळात त्यांच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वेळोवेळी वादळ केले जातील. चेतक इलेक्ट्रिक स्कूटर सर्वोत्तम इलेक्ट्रिक स्कूटर असून 140 हून अधिक शहरांमध्ये 1 लाखांहून अधिक युनिट्स विकण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.