Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

अँटी लॉक ब्रेकिंगसह ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त बाइक; आजच आणा घरी, किंमत आहे फक्त.. । Bajaj Platina 110

या लेखात आम्ही तुम्हाला एका स्वस्तात मस्त बाइकबद्दल माहिती देणार आहोत. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि या बाइकमध्ये ग्राहकांच्या सुरक्षेतची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे.

0

Bajaj Platina 110 :  भारतीय बाजारात आज ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक मस्त बाइक्स उपलब्ध आहे. या लेखात आम्ही तुम्हाला एका स्वस्तात मस्त बाइकबद्दल माहिती देणार आहोत. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि या बाइकमध्ये ग्राहकांच्या सुरक्षेतची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे.

या बाइकमध्ये ग्राहकांना अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम म्हणजेच ABS फीचर्स देखील पाहायला मिळतो. यामुळे जर तुम्ही नवीन बाइक खरेदी करणार असाल तर ही स्वस्तात मस्त बाइक तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय ठरू शकते. चला मग जाणून घेऊया या मस्त बाइकबद्दल सविस्तर माहिती.

आम्ही तुम्हाला सांगतो लोकप्रिय कंपनी बजाज ऑटोने आपल्या 110cc इंजिन बाइक Platina 110 मध्ये  ABS फीचर्स समाविष्ट केले आहे. बाजारात या बाइकची एक्स-शो रूम किंमत 80 हजार रुपये आहे. बजाज ऑटोने आपली लोकप्रिय बाइक Platina 110 ABS सह बाजारात खूप पूर्वी लॉन्च केली होती.

Bajaj Platina 110 सुरक्षितता महत्वाची

दुचाकीस्वारासाठी सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. यामुळेच सरकारने 125cc इंजिनच्या वरील सर्व बाइक्ससाठी ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) अनिवार्य केले आहे. बजाज प्लॅटिना 110 ही देशातील एकमेव बाइक आहे जी या फीचर्ससह येते. इतर कंपन्या देखील हे फीचर्स लागू करत नाहीत कारण यामुळे बाइकची किंमत वाढते, नंतर ते उत्पादन परवडणाऱ्या यादीतून गायब होते.

Bajaj Platina 110  किंमत आणि फीचर्स

बजाज प्लॅटिना 110 ABS चार वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे ज्यात इबोनी ब्लॅक, ग्लॉस प्युटर ग्रे, कॉकटेल वाईन रेड आणि सॅफायर ब्लू यांचा समावेश आहे. Bajaj Platina 110 ABS व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 80 हजार रुपये आहे. माहितीसाठी सांगतो, 100cc ते 110cc पर्यंत इतर कोणत्याही बाइकमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सुविधा उपलब्ध नाही.

बजाज ऑटोच्या मते “जगातील सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात, त्यापैकी 45% दुचाकी वाहनांमुळे होतात. भारतीय ग्राहकांबद्दलची आमची समज दर्शवते की प्रवासी स्वारांना अनेकदा अचानक ब्रेक लावावे लागतात. नवीन Platina 110 ABS सह, बाइक यापुढे अचानक ब्रेक लावल्यानंतरही नियंत्रणाबाहेर जाणार नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता कमी होईल.

Bajaj Platina 110  इंजिन आणि पॉवर

नवीन Bajaj Platina 110 मध्ये 115.45cc एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 8.6 ps पॉवर आणि 9.81Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. रिपोर्टनुसार, ही बाइक एका लिटरमध्ये 70km मायलेज देते.

त्याचा टॉप स्पीड 90 किमी आहे. बाइकमध्ये 11 लीटरची इंधन टाकी आहे. या बाइकमध्ये आता डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. ARAI नुसार, ही बाईक एका लिटरमध्ये 80km पर्यंत मायलेज देते.