Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best 5 Hybrid Cars : जबरदस्त मायलेज आणि उत्कृष्ट फीचर्स! या आहे देशातील टॉप ५ हायब्रीड कार्स, पहा किंमत

देशातील ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या हायब्रीड कार उपलब्ध आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच कार दमदार मायलेज देण्यास ओळखल्या जात आहेत.

0

Best 5 Hybrid Cars : देशात सध्या नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित अनेक कार सादर केल्या जात आहेत. सध्या इलेक्ट्रिक आणि हायब्रीड व्हेरियंट कारला ग्राहकांची चांगली मागणी आहे. त्यामुळे अनेक कंपन्या त्यांच्या हायब्रीड कार सादर करत आहेत.

हायब्रीड कार सर्वोत्तम मायलेज आणि उत्कृष्ट फीचर्ससाठी ओखल्या जातात. तुम्हीही नवीन हायब्रीड कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी टोयोटापासून मारुतीपर्यंतच्या हायब्रीड कार उपलब्ध आहेत.

टोयोटा अर्बन क्रूझर हायराईडर

टोयोटा कार उत्पादक कंपनीची सध्या हायब्रीड कार सेगमेंटमध्ये मजबूत पकड असल्याचे पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या अनेक कार हायब्रीड व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आल्या आहेत.

टोयोटाची हायरायडर एसयूव्ही कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. या कारमध्ये हायब्रीड, सीएनजी आणि प्युअर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या कारच्या हायब्रीड व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 25.30 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा

मारुती सुझुकी आणि टोयोटा कार कंपनीच्या भागीदारीतून अनेक हायब्रीड कार सादर करण्यात आल्या आहेत. मारुतीच्या ग्रँड विटारा कारमध्ये हायब्रीड इंजिन देण्यात आले आहे. ही हायब्रीड कार तुमच्यासाठी अगदी कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. ग्रँड विटारा हायब्रीड कारची एक्स शोरूम किंमत 19.79 लाख रुपये आहे.

होंडा सिटी हायब्रीड

होंडा कार कंपनीच्या सिटी सेडान कारमध्ये देखील हायब्रीड पर्याय देण्यात आला आहे. या सेडान कारमध्ये अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. होंडा सिटी हायब्रीड कारची एक्स शोरूम किंमत 18.99 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी इनव्हिक्टो

मारुती सुझुकी इनव्हिक्टो या फॅमिली एसयूव्ही कारमध्ये देखील टोयोटा innova hycross चे हायब्रीड इंजिन देण्यात आले आहे. ही कार तुमच्यासाठी बेस्ट हायब्रीड कार आहे. कारमध्ये लक्झरी फीचर्स जोडण्यात आले आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत 24.79 लाख रुपये आहे.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस आणि मारुती Invicto या दोन्ही कार एकाच प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आल्या आहेत. मात्र कारमध्ये फचर्स तोडेंफार वेगवेगळे देण्यात आले आहेत. तसेच कारच्या डिझाईनमध्ये देखील फरक आहे. इनोव्हा हायक्रॉस कारची एक्स शोरूम किंमत 25.30 लाख रुपये आहे.