Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best 7 Seater : लाखोंची कमाई करून देणारी कार, 26 kmpl मायलेजसह ‘इतक्या’ स्वस्तात आणा घरी

तुम्ही आता खूप कमी किमतीत मारुतीची एक शानदार कार खरेदी करू शकता. यात शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. पहा सविस्तर माहिती.

0

Best 7 Seater : काही दिवसांपूर्वी बाजारात मारुती सुझुकी एर्टिगा ही कार अनेक अपडेट्ससह लॉन्च केली आहे. दरम्यान, कंपनीने पहिल्यांदाच एर्टिगाच्या टॉप व्हेरियंटमध्ये CNG चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. शिवाय अपडेटेड एर्टिगाच्या लुकमध्ये बदल आणि फीचर्समध्येही तुम्हाला बदल पाहायला मिळेल.

खरंतर एर्टिगा ही भारतीय बाजारात सर्वात अगोदर 2012 मध्ये लॉन्च केली. बऱ्याचवेळा देशातील टॉप-10 मध्ये विकल्या जाणार्‍या कारच्या यादीमध्ये मारुतीच्या या कारचा समावेश होतो. तुम्ही आता ती खूप कमी किमतीत बाजारातून सहज खरेदी करू शकता. जाणून घ्या फीचर्स आणि किंमत.

सध्या भारतीय बाजारात काही कमी बजेटमध्ये येणाऱ्या कार आहेत ज्यांचा टॅक्सी सेवांमध्ये वापर केला जातो. सध्या अशीच एक कार आहे जी टॅक्सीसाठी सर्वात जास्त पसंतीची 7-सीटर कार असून ती खूप कमी किमतीत मायलेज, पॉवर आणि उत्तम फीचर्स देते.

मारुती सुझुकी एर्टिगा

ही मारुतीची 7-सीटर एमपीव्ही मारुती सुझुकी एर्टिगा कार आहे. ज्याला त्याच्या चांगल्या फीचर्स आणि स्पेस तसेच मायलेजसाठी अनेकजण मोठ्या संख्येने खरेदी करत आहेत. कंपनीची ही कार सेगमेंटमध्ये टोयोटा इनोव्हाला जोरदार टक्कर देते.

जाणून घ्या मारुती सुझुकी एर्टिगाची खासियत

मारुती सुझुकी एर्टिगाच्या किमतीचा विचार केला तर दिल्लीमध्ये त्याची एक्स-शोरूम किंमत 8.64 लाख ते 13.08 लाख रुपये इतकी आहे. कंपनीने या कारमध्ये पेट्रोल आणि CNG असे दोन पर्याय दिले आहेत. यामध्ये पेट्रोल कारचे मायलेज 20.3 kmpl आणि CNG कारचे मायलेज 26.11 किमी/किलो आहे. या कारच्या मायलेजमुळे मारुती एर्टिगा अनेकांना परवडते. त्यामुळे वाहतूक क्षेत्रामध्ये एर्टिगाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.

लूक आणि डिझाइन

खरंतर मारुती सुझुकी एर्टिगा लूक आणि डिझाइन खूप आकर्षक आहे. कंपनीने Ertiga ला एक मोठा फ्रंट ग्रिल,फॉग लॅम्प्स आणि रुंद बंपर सोबत प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि ग्रिल वर क्रोम एक्सेंट तुम्हाला यात पाहायला मिळेल. तसेच कारच्या आतील भाग प्रशस्त आहे. मारुती एर्टिगा ही 3-स्टार सेफ्टी रेटिंग (GNCAP) असणारी कार आहे, हे लक्षात ठेवा.