Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best 7 Seater Car : मोठ्या फॅमिलीसाठी उत्कृष्ट आहे 26 Kmpl मायलेज देणारी 7 सीटर कार, किंमत फक्त…

0

Best 7 Seater Car : नवीन कार खरेदी करताना अनेकजण एसयूव्ही कारचा पर्याय निवडत आहेत. एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मात्र मोठ्या फॅमिलीसाठी कार खरेदी करताना MPV कारच खरेदी करणे फायदेशीर आहे.

देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या MPV कार सध्या उपलब्ध आहेत. मात्र किंमत जास्त असल्याने अनेकांना त्या खरेदी करता येत नाही. पण मारुती सुझुकीची स्वस्त 7 सीटर कार तुमच्या फॅमिलीसाठी उत्तम पर्याय आहे.

मारुती सुझुकीची Eeco 7 सीटर कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. या कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात येत आहे. त्यामुळे मायलेजच्या बाबतीत देखील ही कार सर्वांच्या पुढे आहे.

मारुती सुझुकी Eeco MPV कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरमहा या कारच्या 8 ते 10 हजार युनिट्सची विक्री होत आहे. या कारमध्ये 7 प्रवाशी आरामात प्रवास करू शकतात. कारमध्ये कंपनी फिटेड सीएनजी किट देण्यात येत आहे.

मारुती Eeco वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी Eeco 7 सीटर कारमध्ये डिजिटल स्पीडोमीटर, एसीसाठी रोटरी डायल, रिक्लिनिंग फ्रंट सीट्स, मॅन्युअल एसी आणि 12V चार्जिंग सॉकेट अशी वैशिष्ट्ये दिली आहेत.

तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, एबीएस विथ ईबीडी, फ्रंट सीटबेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट आणि रिअर पार्किंग सेन्सर असे फीचर्स दिले आहेत.

मारुती सुझुकी Eeco किंमत

मारुती सुझुकीच्या कार कमी किमतीत दमदार मायलेज देण्यास सक्षम आहेत. Eeco 7 सीटर कारची एक्स शोरूम किंमत 5,21,700 रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6,53,000 लाख रुपयांपर्यंत जाते.

मारुती Eeco इंजिन

मारुती सुझुकी Eeco MPV कारमध्ये 1.2 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. कारचे इंजिन 81 bhp पॉवर आणि 104.4 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

Eeco कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडले आहे. Eeco कारचे पेट्रोल व्हेरियंट 19.71 Kmpl तर सीएनजी व्हेरियंट 26.78 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.