Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best 7 Seater Cars : देशातील मारुती ते टोयोटापर्यंतच्या या 7 सीटर कार खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी! ही कार बनली नंबर वन…

तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी ७ सीटर कारचा पर्याय शोधात असाल तर टॉप ५ कार सर्वोत्तम पर्याय आहेत. या कार सर्वाधिक विक्रीत बाकी ७ सीटर कारच्या पुढे आहेत.

0

Best 7 Seater Cars : देशातील कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांचा सप्टेंबर २०२३ मधील कार विक्री अहवाल सादर केला आहे. यामध्ये ७ सीटर कार विक्रीचा अहवाल देखील समोर आला आहे. यामध्ये टोयोटापासून मारुतीपर्यंतच्या कारचा समावेश आहे.

भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या ७ सीटर कार उपलब्ध आहेत. मोठ्या फॅमिलीसाठी अनेकजण या ७ सीटर कार खरेदी करत आहेत. चला तर जाणून घेऊया टॉप पाच ७ सीटर कारबद्दल…

मारुती सुझुकी एर्टिगा

मारुती सुझुकी एर्टिगा ही पुन्हा एकदा ७ सीटर सेगमेंटमधील सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली आहे. या कारचे मारुतीकडून सप्टेंबर २०२३ मध्ये 13,528 युनिट्सची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये या कारची फक्त 9,299 युनिट्स विकली गेली होती. या कारच्या वार्षिक विक्रीमध्ये 45 टक्के वाढ झाली आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ

महिंद्रा कार निर्मात्या कंपनीची स्कॉर्पिओ ७ सीटर कार सर्वाधिक विक्रीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कारची सप्टेंबर २०२३ मध्ये 11,846 युनिट्सची विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये या कारची फक्त 9,536 युनिट्सची विक्री झाली होती.

महिंद्रा बोलेरो

महिंद्रा कार उत्पादक कंपनीची आणखी एक ७ सीटर कारचा सर्वाधिक विक्रीमध्ये तिसरा क्रमांक लागला आहे. महिंद्राची बोलेरो सप्टेंबर विक्रीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. या कारची 9,519 युनिट्सची विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी सप्टेंबर 2022 8,108 युनिट्सची विक्री झाली होती.

टोयोटा इनोव्हा

टोयोटा कार कंपनीकडून त्यांच्या अनेक ७ सीटर कार भारतात सादर केल्या आहेत. त्यांच्या इनोव्हा ७ सीटर कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वाधीकी विक्रीमध्ये ही कार चौथ्या क्रमांकावर आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये या कारची 8,900 युनिट्स विकली गेली आहे तर गेल्यावर्षी सप्टेंबर 2022 मध्ये कंपनी फक्त 7,282 युनिट्स विकू शकली

महिंद्रा XUV700

महिंद्रा कार उत्पादक कंपनीची आणखी एक कार सर्वाधिक विक्री होणाऱ्या ७ सीटर कारमध्ये आहे. या कंपनीची XUV700 ही कार विक्रीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. या कारची सप्टेंबर 2023 मध्ये 8,555 युनिट्सची विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी महिंद्रा सप्टेंबर 2022 मध्ये फक्त 6,063 युनिट्स विकू शकली.