Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Budget 6 Airbags Car : मारुतीच्या या 36 Kmpl मायलेज देणाऱ्या सुपरकारमध्ये मिळणार 6 एअरबॅग, किंमत 4 लाखांपेक्षा कमी

देशातील सर्वच ऑटो कंपन्यांना १ ऑक्टोबरपासून सर्व कारमध्ये ६ एअरबॅगची सुविधा देण्यास सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांना बेस मॉडेलपासून टॉप मॉडेलपर्यंतच्या सर्व कारमध्ये ६ एअरबॅग मिळणार आहेत.

0

Best Budget 6 Airbags Car : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांमध्ये शेकडो नागरिकांचा जीव जात आहे. त्यामुळे ऑटो कंपन्यांकडून कार निर्मिती करताना त्यामध्ये अनेक सुरक्षा फीचर्स दिले जात आहेत. त्यामुळे कारमधील प्रवाशांना अपघातामध्ये जास्त इजा होत नाही.

नवीन कार खरेदी करताना ग्राहक सुरक्षित कार निवडताना दिसत आहेत. तसेच ५ स्टार सुरक्षा रेटिंग असलेल्या कार खरेदीकडे लोकांचा अधिक कल आहे. सरकारकडून ऑटो क्षेत्रातील सर्वच कंपन्यांना त्यांच्या कारमध्ये १ ऑक्टोबरपासून सर्व कारमध्ये ६ एअरबॅगची सुविधा देण्यास सांगितले आहे.

त्यामुळे आता सर्वच कारमध्ये ६ एअरबॅग पाहायला मिळू शकतात. 6 एअरबॅग्जचा नियम लागू झाल्यानंतर मारुतीच्या Alto K10 या स्वस्त आणि बजेट कारमध्ये देखील ६ एअरबॅग पाहायला मिळू शकतात.

ही कार सध्या बाजारात सर्वात स्वस्त आणि फायदेशीर कार आहे. कारची किंमत देखील खूपच कमी आहे आणि ही कार दमदार मायलेज देते. कारमध्ये सीएनजी आणि पेट्रोल पर्याय देण्यात आला आहे.

तुम्हाला कोणती वैशिष्ट्ये मिळतील?

मारुती सुझुकीकडून त्यांच्या Alto K10 कारमध्ये ABS, EBD, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, चाइल्ड लॉक आणि स्पीड सेन्सिंग डोअर लॉक सोबत 6 एअरबॅग्ज अशी मानक सुरक्षा वैशिष्ट्ये दिली जातील. तसेच या कारमध्ये कारमध्ये मोठी इन्फोटेनमेंट सिस्टम, 4 स्पीकर, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॉवर स्टीयरिंग, पॉवर विंडो, इंजिन इमोबिलायझर असे फीचर्स देखील दिले जाऊ शकतात.

उत्तम इंजिन देखील

मारुती सुझुकीच्या Alto K10 कारमध्ये नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड 1.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. तसेच कारमध्ये सीएनजी व्हेरियंट देखील उपलब्ध आहेत. कार मायलेजच्या बाबतीत सर्व कारच्या पुढे आहे. Alto K10 कार पेट्रोल मोडमध्ये 27 kmpl पर्यंत मायलेज देते तर सीएनजी मोडमध्ये 36 किलोमीटर प्रति किलोपर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे.

Alto K10 किंमत

मारुती सुझुकीकडून नेहमीच मध्यमवर्गीय ग्राहकांचा विचार करून नवीन कार सादर केल्या जात आहेत. त्यामुळे देशात मारुतीच्या कार सर्वाधिक विक्री होत आहेत. मारुती Alto K10 ची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.96 लाख रुपये आहे. Alto K10 सीएनजी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 5.96 लाख रुपये आहे.