Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Budget SUV : 6 लाखात खरेदी करा पैसा वसूल कार! मिळतात 6 एअरबॅग्ज आणि 27 Kmpl मायलेज, पहा फीचर्स

भारतीय ऑटो बाजारात अवघ्या ६ लाख रुपयांमध्ये 6 एअरबॅग्जने सुसज्ज असलेली 27 Kmpl मायलेज देणारी एसयूव्ही कार उपलब्ध आहे. या कारमध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.

0

Best Budget SUV : भारतीय ऑटो बाजाराचा विस्तार दिवसेंदवस वाढत चालला आहे. अनेक कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन कार सादर केल्या जात आहेत. ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या अनेक कार सादर केल्या आहेत. तसेच या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची मायक्रो एसयूव्ही कार Exter गेल्या काही महिन्यांपूर्वी बाजारात सादर केली आहे. या कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कमी किमतीत शानदार फीचर्स मिळत असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद या कारला मिळत आहे.

ग्राहकांची मागणी पाहता ह्युंदाई मोटर्सने ही मायक्रो एसयूव्ही कार लॉन्च केली आहे. तसेच कारमध्ये शानदार फीचर्स देण्यात आल्याने कारची सर्वाधिक मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अनेक फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

Exter एसयूव्ही कशी आहे?

ह्युंदाई Exter कारमध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10 लाख रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे मध्यमवर्गीयांसाठी ही एक सर्वोत्तम कार आहे.

बेस व्हेरिएंट देखील अनेक वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या Exter कार ७ व्हेरियंटमध्ये सादर केली आहे. EX, EX(O), S, S(O), SX, SX(O) आणि SX(O) अशा व्हेरियंटमध्ये ही कार ऑफर करण्यात आली आहे. कारवर 3 वर्षांची अमर्यादित किलोमीटर वॉरंटी देण्यात आली आहे. 6 मोनोटोन आणि 3 ड्युअल टोन एक्सटीरियर रंग पर्यायांमध्ये ही कार सादर करण्यात आली आहे.

वैशिष्ट्ये

ह्युंदाई Exter एसयूव्ही कारमध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह 4.2-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. व्हॉईस इलेक्ट्रिक सनरूफ, ड्युअल कॅमेरा डॅशकॅम, 6 एअरबॅग्ज, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जर, टीपीएमएस, थ्री पॉइंट सीटबेल्ट अशी मानक वैशिष्ट्ये देण्यात आलिया आहेत.

ह्युंदाई Exter इंजिन

ह्युंदाई Exter कारमध्ये 1.2 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6000 rpm वर 81 bhp ची पॉवर आणि 4000 rpm वर 114 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. सीएनजी व्हर्जनमध्ये देखील कार सादर करण्यात आली आहे. पेट्रोल व्हर्जनमध्ये ही कार 19.4kmpl मायलेज देते. तर सीएनजी व्हर्जनमध्ये ही कार 27.1 km/kg मायलेज देते.