Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Cars Under 10 Lakh : १० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये येतात या स्टायलिश कार, मिळतात उत्कृष्ट फीचर्स

नावीन कार खरेदी करण्यासाठी बजेट कमी आहे? तर टेन्शन घेऊ नका. कारण भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या १० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये कार उपलब्ध आहेत.

0

Best Cars Under 10 Lakh : कुटुंबासाठी नवीन कार खरेदी करण्याचा विचार असेल तर भारतीय ऑटो बाजारात एकापेक्षा एक दमदार कार उपलब्ध आहेत. मात्र कारच्या किमती देखील जास्त आहेत. पण तुम्ही १० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये शानदार कार खरेदी करू शकता.

ऑटो मार्केटमध्ये 10 लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये मारुती सुझुकी ते टाटापर्यंतच्या अनेक कार उपलब्ध आहेत. तुम्हालाही १० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये स्वस्त कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी खालील कार सर्वोत्तम पर्याय आहेत.

मारुती अल्टो K10

मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या कार सर्वाधिक विकल्या जातात. कंपनीकडून नेहमीच कमी बजेटमध्ये शानदार कार सादर करण्यात आल्या आहेत. मारुतीची अल्टो K10 तुमच्यासाठी बजेट कार आहे.

अल्टो K10 कारमध्ये 1.0 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 65.7 bhp पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत ३.९९ लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ५.९६ लाख रुपये आहे.

Hyundai Grand i10

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या अनेक कार कमी बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 82 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.73 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.51 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट

मारुती सुझुकीची आणखी एक कार अगदी कमी बजेटमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. स्विफ्ट सेडान कार सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. या कारमध्ये अनेक शानदार फीचर्स देण्यात येत आहेत.

या कारची एक्स शोरूम किंमत ५.९९ लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत ९.०३ लाख रुपये आहे. कारमध्ये 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे ८८.५ बीएचपी पॉवर आणि ११३ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

टाटा टियागो

टाटा मोटर्सकडून त्यांची टियागो कार अगदी १० लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये सादर केली आहे. या कारमध्ये टाटाकडून 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 84 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.60 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.15 लाख रुपये आहे.