Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Cars Without Waiting Period : दिवाळीत विनाप्रतीक्षा घरी आणा या शानदार कार्स, किंमत 4 लाखांपासून सुरु…

यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्हीही शानदार कार खरेदी करण्याचा विचार केला असेल तर टाटा मोटर्स ते मारुती सुझुकी पर्यंतच्या कार विनाप्रतीक्षा घरी आणू शकता.

0

Best Cars Without Waiting Period : देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या कारला प्रचंड मागणी आहे. मागणी जास्त आणि उत्पादन कमी असल्याने कार खरेदीसाठी ग्राहकांना काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

देशात दिवाळीचा सण सुरु झाला आहे. अशात अनेकजण नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असतात. मात्र कारवरील प्रतीक्षा कालावधी जाणून अनेकांना शुभमुहूर्तावर कार खरेदी करणे शक्य होत नाही.

तुम्हालाही या दिवाळीमध्ये शानदार कार खरेदी करायची असेल तर कोणत्याही प्रतीक्षा कालावधीशिवाय तुम्ही सहज कार खरेदी करू शकता. यामध्ये ह्युंदाई, मारुती आणि टाटाच्या ठराविक कारवर कोणताही प्रतीक्षा कालावधी नाही.

रेनॉल्ट क्विड

तुम्हालाही या दिवाळीमध्ये कोणत्याही प्रतीक्षा कालावधीशिवाय नवीन आर खरेदी करायची असेल तर तुम्ही रेनॉल्ट क्विड एसयूव्ही कार सहज घरी आणू शकता. या कारला ग्राहकांची चांगली मागणी आहे. मात्र तुम्हाला ही कार खरेदी करण्यासाठी कसलीही प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.67 लाख रुपये आहे.

Hyundai Grand i10

ह्युंदाई मोटर्सची Grand i10 कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला कोणतीही प्रतीक्षा करावी लागणार नाही. ही हॅचबॅक कार पेट्रोल आणि सीएनजीमध्ये ऑफर करण्यात आली आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 4.91 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7.51 लाख रुपये आहे.

टाटा टियागो

टाटा मोटर्सकडून त्यांची टियागो हॅचबॅक कार ग्राहकांना अगदी कमी बजेटमध्ये उपलब्ध करून दिली आहे. या कारवर कोणतीही प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे.

तसेच टाटा मोटर्सने टियागो कारचे इलेक्ट्रिक व्हेरियंट देखील सादर केले आहे. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 5.60 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.20 लाख रुपये आहे.

मारुती जिमनी

मारुती सुझुकीकडून त्यांच्या जिमनी एसयूव्ही कारवर दिवाळीनिमित्त 1 लाख रुपयांपर्यंत मोठी सूट दिली जात आहे. कार खरेदी कारण्यासाठी तुम्हाला कोणतीही प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 12.74 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15.05 लाख रुपये आहे.