Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best CNG Cars In India : CNG कार खरेदीचा विचार आहे? तर या आहेत उत्कृष्ट परफॉर्मन्स देणाऱ्या ५ सर्वोत्तम कार्स, किंमत १० लाखांपेक्षा कमी

तुम्हालाही कारच्या इंधनावर जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर काही सीएनजी कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. अनेक कंपन्यांच्या सीएनजी कार आहेत.

0

Best CNG Cars In India : पेट्रोल डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे अनेक ग्राहक नवीन कार खरेदी करताना सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडत आहेत. तुम्हालाही देशातील सर्वोत्तम सीएनजी कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी खाली कार सर्वोत्तम पर्याय आहेत.

मारुती सुझुकी बलेनो

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या अनेक सीएनजी कार सादर केल्या आहेत. या सीएनजी कार्सला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.61 लाख रुपयांपासून सुरु होते.

मारुती सुझुकी बलेनो कार सीएनजी व्हर्जनमध्ये 30.61 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारमध्ये 1197 cc इंजिन देण्यात आले आहे. कारचे सीएनजी मॉडेल फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

360-डिग्री कॅमेरा, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, फास्ट चार्जिंग रीअर यूएसबी पोर्ट, ऑटो-डिमिंग IRVM, फूटवेल लॅम्प, एलईडी फॉग लॅम्प आणि 6 एअरबॅग्ज पर्याय देण्यात येत आहे.

Hyundai Aura

ह्युंदाई कार उत्पादक कंपनीची Aura ही सेडान कार देखील सीएनजी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.33 लाख रुपयांपासून सुरू होते. कारमध्ये 1197 cc पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

5 सीटर कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय देण्यात आला आहे. सीएनजी मॉडेलमध्ये फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन पर्यायमध्ये आहे. कारमध्ये अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, व्हॉइस रेकग्निशन, टाइप-सी चार्जिंग पोर्ट, वायरलेस चार्जिंग, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण आणि फूटवेल लाइटिंगसह आठ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे.

मारुती सुझुकी डिझायर

मारुती सुझुकी कंपनीची डिझायर सीएनजी कार देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.52 लाख रुपयांपासून सुरु होते. कारचे सीएनजी मॉडेल ३१.१२ Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. 1197 cc पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

मारुती ब्रेझा

मारुती सुझुकी ब्रेझा एसयूव्ही कारमध्ये देखील सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 8.29 लाख रुपयांपासून सुरू होते. कारचे सीएनजी व्हर्जन २५.५१ Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारमध्ये 1462 cc K-सिरीज इंजिन देण्यात आले आहे.

360 डिग्री कॅमेरा, ऑटो डे/नाईट रीअर व्ह्यू मिरर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह ARKAMYS सराउंड सेन्स सिस्टम, वायरलेस चार्जिंग सिस्टीम अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

टाटा मोटर्स Tiago

टाटा मोटर्सकडून देखील सीएनजी कारची वाढती मागणी पाहता अनेक सीएनजी कार सादर केल्या आहेत. या कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 6.30 लाख रुपयांपासून सुरु होते.ही कार २६.४ Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारमध्ये 1199 cc पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.