Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Compact SUV In India : मारुतीच्या या कारला टक्कर देण्याची कोणाचीही नाही हिम्मत ! 32 Kmpl मायलेज आणि किंमत 10 लाखांपेक्षा कमी

मारुती सुझुकीकडून देशात एसयूव्ही कार सादर करण्यावर अधिक भर दिला जात आहे. तसेच मारुतीच्या नवीन एसयूव्ही कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

0

Best Compact SUV In India : देशातील ऑटो बाजारात एकापेक्षा एक दमदार कार सादर केल्या जात आहेत. तसेच भारतीय ऑटो मार्केटचा विस्तार देखील वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कारच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे अनेक नवीन कार सादर केल्या जात आहेत.

सध्या ऑटो बाजारात एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सेडान कारचे वारे कमी झाले आहे. मारुती सुझुकीकडून त्यांच्या अनेक कमी बजेट एसयूव्ही बाजारात सादर केल्या आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मारुती सुझुकीच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारमध्ये अनेक शानदार फीचर्स देण्यात येत आहेत. हे फीचर्स अगदी कमी बजेटमध्ये दिले जात असल्याने मध्यमवर्गीयांसाठी या कार उत्तम आहेत.

मारुती सुझुकीने त्यांची फ्रॉन्क्स एसयूव्ही कार गेल्या काही महिन्यांपूर्वीच बाजारात सादर केली आहे. या कारमध्ये कंपनीकडून शक्तिशाली इंजिन देण्यात येत आहे. या कारची मागणी देशातच नाही तर विदेशात देखील झपाट्याने वाढली आहे.

शक्तिशाली दोन इंजिन पर्याय

मारुतीकडून फ्रॉन्क्स एसयूव्ही कारमध्ये दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. पहिले 1.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि दुसरे 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या कारच्या दोन व्हेरियंटमध्ये सीएनजी पर्याय देण्यात आले आहेत. ही कार पेट्रोल मोडमध्ये 22 ते 25 किमी प्रति लिटर आणि CNG मोडमध्ये 32 किमी प्रति किलो पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे.

फ्रॉन्क्स कार लॉन्च दरम्यान, ही हॅचबॅक कार म्हणून पाहिली गेली होते परंतु नंतर ही कार कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये गणली जाऊ लागली. फ्रॉन्क्स ही कार क्रॉसओवरसारखी आहे ज्यामध्ये हॅचबॅक आणि एसयूव्ही दोन्ही वैशिष्ट्ये आहेत.

फ्रॉन्क्स वैशिष्ट्ये

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स कारमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 9-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि वायरलेस फोन चार्जिंग अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, हिल-होल्ड असिस्ट, 360 डिग्री कॅमेरा, एबीएस आणि ईबीडी अशी मानक फीचर्स फीचर्स देखील देण्यात आली आहेत.

फ्रॉन्क्स किंमत

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स कार अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कारच्या बेस व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 7.46 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 13.13 लाख रुपये आहे.