Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

‘ह्या’ कार्सना बाजारात मिळतोय लै भारी रिस्पॉन्स! खरेदीसाठी तुफान गर्दी, पहा फोटो। Best Diesel Car

यातच जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन डिझेल कार खरेदीची तयारी करत असाल तर या लेखात आम्ही तुम्हाला भारतीय ऑटो बाजारात सर्वाधिक विक्री होणाऱ्या डिझेल कार्सबद्दल माहिती देणार आहोत

0

Best Diesel Car : भारतीय बाजारात सध्या इलेक्ट्रिक कार आणि पेट्रोल कारला मोठी मागणी होताना दिसत आहे मात्र तरी देखील सध्या बाजारात डिझेल कारची मागणी काही कमी झालेली नाही.

यामुळे आज देखील बाजारात मोठ्या प्रमाणात डिझेल कार विक्री होत आहे. यातच जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन डिझेल कार खरेदीची तयारी करत असाल तर या लेखात आम्ही तुम्हाला भारतीय ऑटो बाजारात सर्वाधिक विक्री होणाऱ्या डिझेल कार्सबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी एक बेस्ट डिझेल कार खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या मस्त आणि सध्या बाजारात धुमाकूळ घालणाऱ्या डिझेल कार्सबद्दल संपूर्ण माहिती.

Tata Altroz  

कंपनीने 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनसह Tata Altroz ​​लाँच केले आहे. याचे इंजिन 88bhp ची कमाल पॉवर आणि 200Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यासोबतच 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. बाजारात त्याची सुरुवातीची किंमत 8.15 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या सेगमेंटमध्ये ही कार सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे.

Mahindra XUV300

Mahindra कंपनीची सब-4 मीटर SUV Mahindra XUV300 कंपनीने 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनसह लॉन्च केली आहे. त्याचे इंजिन 115bhp ची कमाल पॉवर आणि 300Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड एएमटीचा पर्याय देण्यात आला आहे. बाजारात त्याची सुरुवातीची किंमत 9.90 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Mahindra-XUV300--

Kia Sonet

कंपनीने 1.5-लिटर डिझेल इंजिनसह Kia Sonet बाजारात आणले आहे. त्याचे इंजिन 113bhp ची कमाल पॉवर आणि 250Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यासोबत iMT आणि 6-स्पीड AT चा पर्याय देण्यात आला आहे. बाजारात त्याची सुरुवातीची किंमत 9.95 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. बाजारात या कारला देखील मोठी मागणी पाहायला मिळत आहे. भन्नाट फीचर्स आणि बेस्ट मायलेजसह या कारची विक्री देखील तुफान होत आहे.

Tata Nexon

Tata Nexon कंपनीने 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनसह लॉन्च केले आहे. त्याचे इंजिन 113bhp ची कमाल पॉवर आणि 160Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यामध्ये 6-स्पीड एमटी आणि एएमटीचा पर्याय देण्यात आला आहे. बाजारात त्याची सुरुवातीची किंमत 9.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. टाटाची ही एक लोकप्रिय एसयूव्ही कार आहे. जी बाजारात जबरदस्त सेफ्टी फीचर्ससह येते.