Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Electric Scooters : पेट्रोलला करा बाय बाय! खरेदी करा बेस्ट रेंज देणाऱ्या या EV स्कूटर, किंमत फक्त…

पेट्रोलवरील खर्च कमी करायचा असेल तर तुम्ही देखील जबरदस्त रायडींग रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. बाजारात अनेक कंपन्यांच्या उत्तम EV स्कूटर उपलब्ध आहेत.

0

Best Electric Scooters : देशात वाढत्या महागाईबरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यावर अधिक भर देत आहेत. तुम्हालाही सर्वोत्तम रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना स्कूटरची रेंज पाहणे महत्वाचे आहे. तसेच स्कूटरचा बॅटरी पॅक आणि किंमत देखील जाणून घेणे गरजेचे असते. खालील इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत.

सिंपल वन

जबरदस्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बाजारात सिंपल वनची EV स्कूटर फायदेशीर आहे. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 212 किमी रेंज देण्यास सक्षम आहे. स्कूटरमध्ये 5kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. स्कूटरची एक्स शोरूम किंमत 1.45 लाख रुपये आहे.

Ola S1 Pro

Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये देखील मजबूत बॅटरी पॅक देण्यात आला आहे. Ola S1 Pro Gen 2 इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 181 किमी रेंज देण्यास सक्षम आहे. स्कूटरची एक्स शोरूम किंमत 1.40 लाख रुपये आहे.

Hero Vida V1

पेट्रोलवरील खर्च वाचवण्यासाठी तुम्ही Hero Vida V1 ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकता. Hero Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 165 किमी रेंज देण्यास सक्षम आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरूम किंमत 1.26 लाख रुपये आहे.

Ather 450X

कमी बजेटमध्ये शानदार रायडींग रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बाजारात Ather 450X स्कूटर उपलब्ध आहे. सिंगल चार्जमध्ये 146 किमी रेंज देण्यास ही स्कूटर सखसम आहे. Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरूम किंमत 1.28 लाख रुपये आहे.

TVS iQube

TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये देखील जबरदस्त बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 145 किमी रेंज देण्यास सक्षम आहे. TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरूम किंमत 1.22 लाख रुपये आहे.