Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

संधी चुकवू नका! आजच घरी आणा ‘ह्या’ देशातील सर्वात भारी एसयूव्ही कार्स, मजबूत पॉवरट्रेनसह किंमत फक्त 5.99 लाख। Best Micro SUV In India

आज या लेखात आम्ही तुम्हाला देशातील काही सर्वात भारी micro SUV बद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्ही फायदा घेत भन्नाट फीचर्स आणि बेस्ट मायलेजसह येणाऱ्या micro SUV अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये घरी आणू शकतात.

0

Best Micro SUV In India : जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन एसयूव्ही कार खरेदीचा करणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय ऑटो बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट फीचर्स आणि बेस्ट स्पेससह एकापेक्षा एक मस्त मस्त एसयूव्ही उपलब्ध आहे.

आज या लेखात आम्ही तुम्हाला देशातील काही सर्वात भारी micro SUV बद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्ही फायदा घेत भन्नाट फीचर्स आणि बेस्ट मायलेजसह येणाऱ्या micro SUV अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये घरी आणू शकतात. चला मग जाणून घ्या या मस्त मस्त micro SUV बद्दल संपूर्ण माहिती.

Hyundai Exter

भारतीय बाजारात काही दिवसापूर्वी Hyundai Motors ने आपली बहुप्रतिक्षित Hyundai Exter micro SUV लाँच केली आहे. या एसयूव्ही कारमध्ये ग्राहकांना जबरदस्त सेफ्टी फीचर्स देखील पाहायला मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो कंपनीने याला 5.99 लाख रुपयांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किंमतीत बाजारात लॉन्च केले आहे. बाजारात हि कार Tata Punch, Maruti Suzuki Ignis आणि Citroën C3 ला टक्कर देणार आहे.

कंपनीने Hyundai Exter चे पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंट बाजारात आणले आहेत ज्याची किंमत 5.99 लाख ते 9.42 लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमत 7.97 लाख रुपयांवरून 10.10 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या SUV चा CNG व्हेरियंट 8.24 लाख ते 8.97 लाख रुपयांच्या रेंजमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Tata Punch

कंपनीने Tata Punch चे पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंट बाजारात आणले आहेत ज्याची किंमत 5.99 लाख ते 8.92 लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमत 7.49 लाख रुपयांवरून 9.52 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या टाटा मोटर्सची ही एसयूव्ही देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हीपैकी एक आहे. ग्राहकांना या कारमध्ये जबरदस्त मायलेज तसेच बेस्ट फीचर्स आणि उत्तम स्पेस देखील पाहायला मिळतो.

Tata Punch

Maruti Suzuki Ignis

कंपनीने मारुती सुझुकी इग्निसचे पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंट बाजारात आणले आहेत ज्याची किंमत 5.84 लाख ते 7.61 लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमत 6.93 लाख रुपयांवरून 8.16 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्यात सीएनजीचा पर्याय दिलेला नाही.

Citroen C3

कंपनीने Citroen C3 चे पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंट बाजारात सादर केले आहेत ज्याची किंमत 6.16 लाख ते 8.92 लाख रुपये आहे. त्यात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय नाही. यामुळे जर तुम्ही नवीन आणि स्वस्तात मस्त एसयूव्ही कार खरेदीचा विचार करत असाल तर ही कार तुमच्यासाठी सर्वात भारी पर्याय ठरू शकते. याचा मुख्य कारण म्हणजे या कारमध्ये ग्राहकांना एकापेक्षा एक मस्त फीचर्स कंपनीकडून ऑफर करण्यात येत आहे.