Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Mileage 7 Seater Car : गाव असो वा शहर… ही 7 सीटर SUV देते 22 Kmpl मायलेज, किंमत 10लाखांपेक्षा कमी

तुम्हालाही शानदार मायलेज देणारी ७ सीटर एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बाजारात अनेक कार उपलब्ध आहेत. तसेच कारच्या किमती देखील कमी आहेत.

0

Best Mileage 7 Seater Car : मोठ्या कुटुंबासाठी नवीन कार खरेदी करत असताना अनेकजण ७ सीटर कारचा पर्याय निवडत असतात. बाजारात अनेक कंपन्यांच्या ७ सीटर कार उपलब्ध आहेत. मात्र कार खरेदीदार दमदार मायलेज देणाऱ्या स्वस्त ७ सीटर कारचा पर्याय निवडत असतात.

तुमचेही तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महिंद्राची बोलेरो ७ सीटर कार सर्वोत्तम पर्याय आहे. ही कार कोणत्याही रस्त्यावर सहज प्रवास करू शकते.

महिंद्रकडुन त्यांच्या अनेक स्वस्त ७ सीटर कार ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्राहकांचा देखील या कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे. उत्कृष्ट फीचर्स आणि दमदार मायलेजसाठी ही कार ओळखली जाती.

शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट मायलेज

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या सर्वच कारमध्ये शक्तिशाली इंजिन देण्यात येत आहे. सध्या बाजारातील त्यांच्या बोलेरो कारमध्ये देखील शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे. कारमध्ये 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे.

बोलेरो कारमध्ये देण्यात आलेले इंजिन 74.96 bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. कार फक्त रिअर व्हील ड्राइव्ह पर्यायासह उपलब्ध आहे. ही कार 22 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. त्यामुळे शानदार मायलेज देणारी ही कार तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

किंमत किती आहे

महिंद्रा बोलेरो ७ सीटर कारची एक्स शोरूम किंमत 9.79 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.80 लाख रुपये आहे. ही कार कंपनीकडून 3 व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. ही कार फक्त मॅन्युअल गियर शिफ्टसह ऑफर केली आहे.

महिंद्रा बोलेरो वैशिष्ट्ये

महिंद्रा बोलेरो कारमध्ये अनेक प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत. डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॉवर स्टीयरिंग, दोन एअरबॅग, म्युझिक सिस्टम, एबीएस, ईबीडी, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, एसी आणि पॉवर विंडो अशी वैशिष्ट्ये कारमध्ये देण्यात आली आहेत.