Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Mileage Bike : शक्तिशाली इंजिन आणि दमदार मायलेज! HF Deluxe बाईक खरेदी करा फक्त 3,446 रुपयांमध्ये, असा घ्या लाभ

नवीन बाईक खरेदी करायचीय पण बजेट नाही? तर काळजी करू नका. आता तुम्ही अगदी 3,446 रुपयांमध्ये HF Deluxe बाईक खरेदी करू शकता.

0

Best Mileage Bike : प्रत्येकाचे नवीन बाईक खरेदी करण्याचे स्वप्न असते. मात्र बाईकच्या किमती जास्त असल्याने अनेकांना त्या खरेदी करणे शक्य होत नाही. पण आता दुचाकी ऑटो बाजारात उपलब्ध असलेली HF Deluxe बाईक अवघ्या ३,४४६ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या बाईक्स उपलब्ध आहेत. मात्र कमी बजेट ग्राहकांना त्या खरेदी करणे अशक्य आहे. पण कमी बजेट ग्राहक देखील स्वस्तात शानदार मायलेज देणारी बाईक खरेदी करू शकतात. HF Deluxe ही बाईक ग्राहकांच्या खिशाला परवडणारी बाईक आहे.

70 KMPL चे मायलेज देते

हिरो दुचाकी निर्मात्या कंपनीकडून शानदार मायलेज देणारी HF Deluxe बाईक ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. ही बाईक सध्या बाजारात लोकप्रिय बाईक ठरत आहे. बाईकमध्ये 97.2 cc चे इंजिन देण्यात आले आहे.

HF Deluxe बाईकमध्ये देण्यात आलेले 97.2 cc चे इंजिन 8 PS पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकचे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. ही बाईक 65 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

हिरो एचएफ डिलक्स वैशिष्ट्ये

हिरो एचएफ डिलक्स बाईकमध्ये कंपनीकडून अनेक उत्कृष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. बाईकचा लूक स्टायलिश बनवण्यात आला आहे. बाईकमध्ये हॅलोजन हेडलाइट, इंडिकेटर आणि टेल लॅम्प देण्यात आला आहे.

बाइकला अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. स्पीडोमीटर आणि इंधन गेजची माहिती त्याच्या अॅनालॉग कन्सोलमध्ये दिसते. बाईकमध्ये इंधन बचत करणारे i3S तंत्रज्ञान देखील देण्यात आले आहे. या तंत्रज्ञानामुळे बाईकचे मायलेज वाढवण्यास मदत होते.

तुम्हाला बाइक फक्त 3,446 रुपयांमध्ये मिळेल

तुमचेही बजेट कमी असेल आणि तुम्हाला HF Deluxe बाईक खरेदी करायची असेल तर आता अगदी कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता. 3,500 रुपयांच्या डाउन पेमेंटवर ही बाईक घरी आणू शकता. या बाईकची एक्स शोरूम किंमत 59,018 रुपये आहे.

3,500 रुपयांचे डाउनपेमेंट भरून ही बाईक घरी आणली तर तुम्हाला बाकीचे पैसे कर्जाच्या स्वरूपात फायनान्स कंपनीकडून दिले जातील. हे पैसे ३६ महिन्यांसाठी वार्षिक १०% व्याजदराने दिले जातील. या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला २,३६४ रुपयांचा दरमहा EMI भरावा लागेल.