Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

दमदार मायलेज अन् स्टायलिश लूकसह ‘इतक्या’ स्वस्तात घरी आणा ‘ह्या’ जबरदस्त बाइक्स, किंमत 61 हजार। Best Mileage Bikes

या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला देशातील काही सर्वात भारी आणि दमदार मायलेजसह येणाऱ्या बाइकबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी एक बेस्ट बाइक परवडणाऱ्या किमतीमध्ये घरी आणू शकतात.

0

Best Mileage Bikes:  आपल्या देशात सध्या पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे मायलेज बाइकसाठी मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. यामुळे जर तुम्ही देखील कमी किमतीमध्ये दमदार मायलेजसह येणारी नवीन बाइक खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे .

आम्ही तुम्हाला सांगतो या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला देशातील काही सर्वात भारी आणि दमदार मायलेजसह येणाऱ्या बाइकबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी एक बेस्ट बाइक परवडणाऱ्या किमतीमध्ये घरी आणू शकतात.  चला मग जाणून घेऊया या मस्त आणि बेस्ट बाइक्सबद्दल संपूर्ण माहिती.

 TVS Sport

TVS Sport ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाइक मानली जाते. या बाइकमध्ये कंपनीने 109.7 cc चे BS6 इंजिन दिले आहे. हे इंजिन 8.18 Bhp कमाल पॉवर आणि 8.7 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. यात दोन्ही बाजूंना ड्रम ब्रेक आहेत. याशिवाय 10 लीटरची इंधन टाकीही यात देण्यात आली आहे. कंपनीने या बाइकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 61,000 रुपये ठेवली आहे. तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 67,530 रुपयांपर्यंत जाते. ही बाइक 70 किमी प्रति लीटर मायलेज देते.

Hero HF Deluxe

Hero HF Deluxe ही Hero MotoCorp ची सर्वात लोकप्रिय बाइक मानली जाते. या बाइकमध्ये कंपनीने 97.2 cc BS6 इंजिन दिले आहे. हे इंजिन 7.91 Bhp कमाल पॉवर आणि 8.05 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. त्याच्या पुढच्या आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक्सही दिलेले आहेत. यात 9.1 लीटरची इंधन टाकी मिळते. कंपनीने त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 55,000 रुपये ठेवली आहे. तर टॉप मॉडेलची किंमत 67 हजार रुपयांपर्यंत जाते. कंपनीचा दावा आहे की ही बाइक 65 किमी प्रति लीटर मायलेज देते.

Hero Splendor Plus Xtec

Splendor Plus Xtec ही Hero MotoCorp ची दुसरी सर्वाधिक पसंतीची बाइक मानली जाते. या बाइकमध्ये कंपनीने 97.2 cc चे BS6 इंजिन दिले आहे. हे इंजिन 7.9 Bhp कमाल पॉवर आणि 8.05 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. या बाइकच्या मागील आणि पुढच्या भागात एकत्रित ब्रेकिंग सिस्टम देखील देण्यात आली आहे. कंपनीने या बाइकमध्ये 9.8 लीटरची इंधन टाकी देखील दिली आहे. कंपनीच्या मते ही बाइक 60 किमी पर्यंत मायलेज देते. त्याच वेळी कंपनीने त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 76 हजार रुपये ठेवली आहे.

Honda SP 125

Honda SP 125 ही कंपनीची सर्वात भारी बाइक मानली जाते. या बाइकध्ये 124 cc BS6 इंजिन आहे जे 10.72 bhp ची कमाल पॉवर आणि 10.9 Nm चा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. यासोबतच त्याच्या पुढच्या आणि मागील बाजूस ड्रम ब्रेकसह एकत्रित ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 83,088 रुपये ठेवण्यात आली आहे. तर टॉप मॉडेलची किंमत 79,702 रुपयांपर्यंत जाते. कंपनीच्या मते, ही बाइक 65 किमी प्रति लीटर मायलेज देते.

Honda Livo

Honda Livo ही कंपनीची कूलेस्ट बाइकही मानली जाते. कंपनीने ही बाइक 2 व्हेरियंटमध्ये आणि 4 रंगांमध्ये बाजारात आणली आहे. यात 109.51 cc BS6 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 8.67 Bhp कमाल पॉवर आणि 9.30 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. या बाइकमध्ये 9 लीटरची इंधन टाकी देखील देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ही बाइक तुम्हाला सुमारे 58 किमी मायलेज देते. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 75 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.