Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Mileage Bikes : खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये खरेदी करा 5 सर्वोत्तम मायलेज बाईक्स, पहा यादी आणि किंमत

0

Best Mileage Bikes : देशातील दुचाकी मार्केटमध्ये अनेक कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन बाईक्स बाजारात सादर केल्या आहेत. त्यांच्या बाईकला ग्राहकांची प्रचंड मागणी देखील आहे. मात्र वाढत्या महागाईबरोबर बाईकच्या किमती देखील वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकांना बाईक खरेदी करणे अशक्य झाले आहे.

नवीन बाईक खरेदी करताना अनेकजण दमदार मायलेज देणाऱ्या बाईकचा पर्याय निवडत असतात. तुमच्याही खिशात 1 लाख रुपये असतील आणि शानदार बाईक खरेदी करायची असेल तर बाजारात अनेक कंपन्यांच्या बाईक उपलब्ध आहेत. सध्या बाजारात 100-125cc बाईकला जास्त मागणी असल्याचे दिसत आहे.

Honda Shine 125cc

होंडा दुचाकी कंपनीकडून त्यांची Shine 125cc बाईक ग्राहकांना कमी बजेटमध्ये उपलब्ध करून दिली आहे. या बाईकला बाजारात चांगली मागणी आहे. Shine 125cc बाईक 65-70 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देण्यास सक्षम आहे.

बाईकमध्ये 125cc सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे जे 10.59 bhp पॉवर आणि 11 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकची ऑन-रोड किंमत 92,711 रुपये ठेवण्यात आली आहे.

Hero Glamour

हिरो देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे. या कंपनीची Glamour बाईक तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. बाईकची ऑन रोड किंमत 95,181 रुपये आहे.

बाईकमध्ये 124.7cc सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे जे 10.7 bhp पॉवर आणि 10.6 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही बाईक 55 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

Hero HF Deluxe

हिरोची HF Deluxe बाईक 68,888 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. बाईकमध्ये 100cc इंजिन देण्यात आले आहे जे 7.91 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. HF Deluxe बाईक 65 kmpl मायलेज देते.

बजाज प्लॅटिना 110

बजाज दुचाकी उत्पादक कंपनीच्या बाईकला देखील ग्राहकांची चांगली मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. कमी बजेट ग्राहकांसाठी बजाजची प्लॅटिना 110 बाईक उत्तम पर्याय आहे. ही बाईक 70 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. बाईकमध्ये 115.45cc इंजिन देण्यात आले आहे. बाईकची ऑन रोड किंमत 86,227 रुपये आहे.

TVS स्टार स्पोर्ट

TVS ची स्टार स्पोर्ट बाईक देखील कमी बजेट ग्राहकांसाठी उत्तम बाईकचा पर्याय आहे. ही स्टायलिश बाईक अगदी 70,646 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. बाईकमध्ये 107cc इंजिन देण्यात आले आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये बाईक 68 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.