Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Mileage Bikes In India : 72 Kmpl मायलेज आणि किंमत 1 लाखांपेक्षा कमी, या आहेत लोकप्रिय बाईक, पहा एका क्लिकवर संपूर्ण यादी

तुम्हालाही कमी बजेटमध्ये मजबूत मायलेज देणारी बाईक खरेदी करायची असेल तर बाजारात 72 Kmpl मायलेज देणाऱ्या बाईक उपलब्ध आहेत. या बाईकच्या किमती देखील खूपच कमी आहेत.

0

Best Mileage Bikes In India : नवीन बाईक खरेदी करताना अनेकजण दमदार मायलेज देणाऱ्या बाईकचा पर्याय निवडत आहेत. देशात पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्याने अनेकांना कमी मायलेज बाईक्स वापरणे न परवडण्यासारखे झाले आहे.

अनेक बाईक निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या उत्तम बाईक्स बाजारात सादर केल्या आहेत. तसेच त्यांच्या किमती देखील जास्त आहेत. वाढत्या महागाई बरोबर बाईकच्या किमती देखील वाढल्या आहेत. मात्र काही उत्तम मायलेज देणाऱ्या बाईक अगदी कमी बजेटमध्ये बाजारात उपलब्ध आहेत.

Bajaj Platina 100

बजाज दुचाकी उत्पादक कंपनीकडून त्यांची Platina 100 बाईक बाजारात ग्राहकांना अगदी कमी बजेटमध्ये उपलब्ध करून दिली आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 65,952 रुपये आहे. १ लिटर पेट्रोलमध्ये 72 Kmpl मायलेज देण्यास ही बाईक सक्षम आहे. बाईकमध्ये आकर्षक अलॉय व्हील्स, LED DRL देण्यात आले आहेत.

TVS Sport बाईक

TVS Sport बाईक देखील तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 61,602 रुपये आहे. Sport बाईकमध्ये 109.7cc BS6 इंजिन देण्यात आले आहे जे 8.18 bhp पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. १ लिटर पेट्रोलमध्ये 70 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

Hero HF Deluxe

हिरो ही देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी आहे. या कंपनीची HF Deluxe बाईक तुमच्यासाठी उत्तम बाईकचा पर्याय आहे. HF Deluxe बाईक 65 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. बाईकची एक्स शोरूम किंमत 56,193 रुपये आहे. बाईकमध्ये 97.2cc BS6 इंजिन दिले आहे जे 7.91 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

Honda SP 125

होंडा दुचाकी निर्मात्या कंपनीची SP 125 बाईक देखील १ लिटर पेट्रोलमध्ये 65 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. बाईकमध्ये 124cc BS6 इंजिन देण्यात आले आहे. जे 10.72 bhp पॉवर आणि 10.9 Nm टॉर्क जनरेट करते. बाईकची एक्स शोरूम किंमत 72,900 रुपये आहे.