Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Mileage Car : मित्रमैत्रिणींसोबत लाँग ड्राईव्हला जायचंय? तर या देशातील दमदार मायलेज कार, किंमत 5 लाखांपासून सुरु

तुम्हीही तुमच्या फॅमिलीसाठी स्वस्त आणि दमदार मायलेज देणारी कार शोधत असाल तर तुमच्यासाठी अनेक कार ऑटो मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यांचीच किंमत देखील ५ लाख रुपयांपासून सुरु होते.

0

Best Mileage Car : तुम्हीही वीकेंडला तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत सतत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक शानदार मायलेज कार उपलब्ध आहेत. तसेच त्यांच्या किमती देखील खूपच कमी आहेत.

स्वस्त आणि दमदार मायलेज देणाऱ्या खालील कार

मारुती ब्रेझा

मारुती सुझुकीची ब्रेझा कार ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही सेगमेंटमधील कार आहे. या ५ सीटर कॉम्पॅक्ट एसयूव्हीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारमध्ये 1.4 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तसेच कारमध्ये सीएनजी पर्याय देखील ऑफर करण्यात येत आहे.

पेट्रोल मोडमध्ये ही कार 25 Kmpl मायलेज देते तर सीएनजी मोडमध्ये 32 Kmpl मायलेज देण्यास ही कार सक्षम आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.29 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 14.14 लाख रुपये आहे.

टाटा नेक्सॉन

टाटा मोटर्सची सर्वाधिक विकली जाणारी नेक्सॉन कार देखील लाँग ड्राईव्हसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या कारमध्ये डिझेल आणि पेट्रोल असे दोन इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. पेट्रोल व्हर्जनमध्ये ही कार 20 Kmpl आणि डिझेलमध्ये 28 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 14.60 लाख रुपये आहे.

मारुती बलेनो

मारुती सुझुकीची बलेनो कार लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. कारमध्ये 1.2 लिटर इंजिन देण्यात आले आहे. बलेनो कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजीचे पर्याय देण्यात आले आहेत. बलेनो कार पेट्रोल मोडमध्ये 25 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे तर सीएनजी व्हर्जनमध्ये 34 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.61 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.88 लाख रुपये आहे.

ह्युंदाई एक्स्टर

ह्युंदाई मोटर्सकडून अलीकडेच त्यांची मायक्रो एसयूव्ही एक्स्टर कार सादर केली आहे. या कारला देखील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10.10 लाख रुपयांपर्यंत जाते. कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. पेट्रोल मोडमध्ये ही कार 24 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे तर सीएनजीवर 32 Kmpl मायलेज देते.

टाटा 

टाटा मोटर्सची पंच कार देखील वीकेंडला लाँग ड्राईव्हला जाण्यासाठी सर्वोत्तम कार आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरु होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.52 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार सीएनजीमध्ये 34 आणि पेट्रोल व्हर्जनमध्ये 25 Kmpl मायलेज देते.