Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Mileage Cars : मारुतीच्या 26 Kmpl मायलेज देणाऱ्या कार खरेदी करा अवघ्या 5 लाखांपासून

तुम्हालाही दमदार मायलेज देणारी कार खरेदी करायची असेल तर ऑटो मार्केटमध्ये मारुतीच्या शानदार कार उपलब्ध आहेत. या कार २६ Kmpl पेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम आहेत.

0

Best Mileage Cars : देशात महागाई वाढत चालली आहे. अशातच पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेकजण नवीन कार खरेदी करताना दमदार मायलेज देणाऱ्या कारचा पर्याय निवडत असतात. मारुती सुझुकीच्या उत्तम मायलेज देणाऱ्या कार अगदी कमी बजेटमध्ये उपलब्ध आहेत.

तुम्हालाही कमी बजेटमध्ये उत्तम मायलेज देणाऱ्या कार खरेदी करायच्या असतील तर मारुतीच्या कार बेस्ट पर्याय आहे. मारुती सुझुकीच्या कार मध्यमवर्गीयांसाठी सर्वोत्तम कार आहेत.

मारुती सुझुकी सेलेरियो

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुतीची सेलेरिओ कार उत्तम मायलेज देण्यास ओळखली जाते. कारचे मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरियंट २५.२४ Kmpl मायलेज देते तर AMT व्हेरियंट २६.६८ Kmpl मायलेज देते. कारची एक्स शोरूम किंमत 5.45 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी वॅगन आर

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या दमदार मायलेज देणाऱ्या स्वस्त का भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. मारुतीची वॅगन आर कार देखील उत्तम मायलेज देते. कारची एक्स शोरूम किंमत 5.55 लाख रुपयांपासून सुरु होते. तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 8.50 लाख रुपये आहे.

कारचे 1.0 लीटर पेट्रोल इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशन 24.35 Kmpl मायलेज देते तर AMT व्हेरियंट 25.19 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारचे 1.2 लिटर पेट्रोल इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशन 23.56 Kmpl तर हेच इंजिन असलेले AMT व्हेरियंट 24.43 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी डिझायर

मारुती सुझुकीची डिझायर कार देखील सर्वोत्तम मायलेज देण्यास सक्षम आहे. कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. कारचे मॅन्युअल व्हेरियंट 22.41 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

तसेच AMT व्हेरियंट 22.61 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. डिझायर कारची एक्स शोरूम किंमत 6.52 लाख रुपयांपासून सुरु होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.39 लाख रुपये आहे.