Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Mileage Cars In India : 6 लाखांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा 34 Kmpl मायलेज देणाऱ्या स्टायलिश कार

वाढत्या महागाईत तुम्हालाही कमी बजेटमध्ये उत्तम मायलेज देणाऱ्या कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी मारुती ते ह्युंदाईच्या कार ऑटो मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

0

Best Mileage Cars In India : देशातील ऑटो मार्केटमध्ये दिवसेंदिवस कारच्या मागणीत वाढ होत आहे. तसेच नवीन कार खरेदीदार कमी बजेटमध्ये दमदार मायलेज देणाऱ्या कारचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे अनेक कार उत्पादक दमदार मायलेज देणाऱ्या स्वस्त कार सादर करत आहेत.

तुम्हालाही शानदार मायलेज देणारी ६ लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये उत्तम कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी अनेक कार उपलब्ध आहेत. या कारची किंमत जरी कमी असली तरी उत्कृष्ट फीचर्स कारमध्ये देण्यात आले आहेत.

अल्टो K10

मारुती सुझुकीची अल्टो K10 कार उत्तम मायलेज देण्यास सक्षम आहे. ही कार पेट्रोलमध्ये 24.39 Kmpl आणि सीएनजीमध्ये 33.85 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारची एक्स शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे.

मारुती S-Presso

मारुती सुझुकीची S-Presso कार देखील कमी बजेटमध्ये दमदार मायलेज देण्यासाठी सक्षम आहे. कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय दिला आहे. कारचे पेट्रोल व्हेरियंट 24 Kmpl आणि सीएनजी व्हेरियंट 32 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारची एक्स शोरूम किंमत 4.26 लाख रुपये आहे.

Renault Kwid

Renault कार उत्पादक कंपनीची Kwid कार दमदार मायलेज देण्यास सक्षम आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 4.70 लाख रुपये आहे. ही ५ सीटर कार अगदी कमी बजेटमध्ये उपलब्ध असून पेट्रोलमध्ये 20-22 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी Celerio

मारुती सुझुकी Celerio कार दमदार मायलेज देण्यास सक्षम असून कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.37 लाख रुपये आहे. ही कार पेट्रोल आणि CNG मध्ये उपलब्ध आहे. कारचे पेट्रोल व्हेरियंट २५.२४ Kmpl आणि सीएनजी व्हेरियंट ३५ Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

ह्युंदाई i10

ह्युंदाईची i10 कार हॅचबॅक कार उत्तम मायलेज देण्यास ओळखली जाते. कारची एक्स शोरूम किंमत 5.84 लाख रुपये आहे. कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय ऑफर करण्यात आलं असून कारचे पेट्रोल व्हेरियंट 19.2 Kmpl आणि CNG व्हेरियंट 28 Kmpl मायलेज देते.