Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Mileage CNG Cars : खरेदी करा खिशाला परवडणाऱ्या या बेस्ट CNG कार, किंमत 6 लाखांपासून सुरु

तुम्हालाही कमी बजेटमध्ये उत्तम सीएनजी कार खरेदी करायची असेल तर मारुती ते टोयोटापर्यंतच्या स्वस्त सीएनजी कार बाजारात उपलब्ध आहेत.

0

Best Mileage CNG Cars : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा काळात अनेकजण सीएनजी कारचा पर्याय निवडत आहेत. तुम्हाला देखील कमी बजेटमध्ये उत्तम सीएनजी कार खरेदी करायची असेल तर मारुती ते टोयोटाच्या कार बाजारात उपलब्ध आहेत.

सीएनजी कार पेट्रोल कारच्या तुलनेत जास्त मायलेज देतात. त्यामुळे या सीएनजी कारला बाजारात चांगली मागणी आहे. तसेच काही कारच्या किमती देखील कमी असल्याने तुमच्यासाठी CNG कारचा पर्याय उत्तम पर्याय आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीने त्यांच्या अनेक सीएनजी कार सध्या ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. सेलेरियो सीएनजी कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. कंपनी फिटेड सीएनजी किट या कारमध्ये देण्यात येत आहे. सेलेरियो कारचे सीएनजी व्हेरियंट 35.60 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारची एक्स शोरूम किंमत 6.72 लाख रुपये आहे.

मारुती वॅगन आर सीएनजी

मारूती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या वॅगन आर कारमध्ये देखील कंपनी फिटेड सीएनजी किट देण्यात आले आहे. वॅगन आर कारचे सीएनजी व्हेरियंट 32.52 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारची एक्स शोरूम किंमत 6.42 लाख रुपये आहे.

Hyundai Grand i10 nios CNG

ह्युंदाई मोटर्सकडून grand i10 nios CNG कार ग्राहकांना 7.56 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीमध्ये उपलब्ध करून दिली आहे. कारचे सीएनजी मॉडेल 28 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर सीएनजी

टोयोटा कार उत्पादक कंपनीची शानदार हायरायडर एसयूव्ही कारमध्ये देखील सीएनजी पर्याय दिला आहे. कारचे सीएनजी व्हेरियंट २६.६ Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारच्या S आणि G व्हेरियंटमध्ये सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. कारची एक्स शोरूम किंमत 12.23 लाख रुपये आहे तर सीएनजी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 15.29 लाख रुपये आहे.

मारुती एर्टिगा CNG

मारुती सुझुकीची लोकप्रिय ७ सीटर सीएनजी कार एर्टिगा देखील कमी बजेट ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहे. कारचे सीएनजी व्हेरियंट 26.11 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. कारच्या दोन व्हेरियंटमध्ये सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. VXI CNG व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 10.44 लाख रुपये आहे. ZXI व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 11.54 लाख रुपये आहे