Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Mileage Scooters : देशातील या शानदार स्कूटर कमी किमतीत देतात दमदार मायलेज! पहा किंमत

सणासुदीच्या काळात नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार असेल तर बाजारात 125 सेगमेंटमधील अनेक स्कूटर उपलब्ध आहेत. या स्कूटर कमी किमतीत सर्वाधिक मायलेज देतात.

0

Best Mileage Scooters : देशातील ऑटो क्षेत्रात अनेक कंपन्यांच्या जबरदस्त स्कूटर उपलब्ध आहेत. मात्र काही कंपन्यांच्या स्कूटर खूपच महाग आहेत तर काही स्वस्त आहेत. तुम्हालाही स्वस्तात दमदार मायलेज देणाऱ्या स्कूटर खरेदी करायच्या असतील तर खालील स्कूटर सर्वोत्तम पर्याय आहेत.

Suzuki Access-125

दुचाकी कंपनी सुझुकीची Access-125 स्कूटर तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. ही स्कूटर दमदार मायलेज देण्यासाठी ओळखल्या जातात. स्कूटरमध्ये 124 सीसी इंजिन देण्यात आले आहे. स्कूटरची एक्स शोरूम किंमत 80 आहे. ही स्कूटर ५ व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे.

Access-125 ही स्कूटर स्टँडर्ड एडिशन – शीट मेटल व्हील्स, ड्रम-अॅलॉय व्हील्स, डिस्क-अॅलॉय व्हील्स, स्पेशल एडिशन आणि राइड कनेक्ट एडिशन या व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. ही स्कूटर 57.22 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देण्यास सक्षम आहे.

स्कूटरला समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि ड्रम आणि डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. स्कूटरमध्ये एलईडी हेडलाइट, अलॉय व्हील्स, इंजिन किल स्विच, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, फ्रंट आणि रिअर कॅरी हुक, वन पुश सेंट्रल लॉक सिस्टम, ब्लूटूथ, नेव्हिगेशन, यूएसबी चार्जिंग पोर्ट अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

TVS ज्युपिटर-125

TVS दुचाकी निर्मात्या कंपनीची ज्युपिटर-125 स्कूटरमध्ये देखील दमदार मायलेज देणारे 124.8 CC इंजिन देण्यात आले आहे. स्कूटर ३ व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. तसेच चार रंग पर्यायांमध्ये ही स्कूटर उपलब्ध आहे.

स्कूटरमध्ये 33 लीटर अंडरसीट स्पेस, आकर्षक 12-इंच चाके, समोर टेलिस्कोपिक आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आली आहेत. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 98,826 हजार रुपये आहे.

यामाहा फॅसिनो-125

यामाहा दुचाकी उत्पादक कंपनीकडून त्यांची Fascino-125 स्कूटर बाजारात सादर केली आहे. ही स्कूटर 50 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. स्कूटरमध्ये 125 सीसी इंजिन वापरण्यात आले आहे. स्कूटरची सुरवातीची एक्स शोरूम किंमत 79,600 हजार रुपये आहे.

स्कूटरमध्ये एलईडी हेडलाइट्स आणि टेललाइट्स स्टायलिश ‘V’ पॅटर्नमध्ये देण्यात आले आहेत. ब्लॅक फिनिशिंगसह आकर्षक ब्रेक आणि अंडरसीट स्टोरेज खूप चांगले आहे. यूएसबी चार्जिंग पॉइंट, डिजिटल कन्सोल आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Honda Activa-6G

होंडा Activa-6G स्कूटर देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. स्कूटरमध्ये 110CC सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7.68 हॉर्स पॉवर आणि 8.79 NM टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही स्कूटर 55 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

स्कूटरची इंधन टाकी 5.3 लीटर क्षमतेची आहे. स्कूटरची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 76,234 रुपये आहे. बाजारात या स्कूटरला सर्वाधिक मागणी आहे. तुम्ही देखील ही शक्तिशाली इंजिनसह येणारी स्कूटर खरेदी करू शकता.