Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Mileage SUV : Nexon, Brezza आणि Fronx कोणती SUV देते दमदार मायलेज, पहा सविस्तर

ऑटो बाजारात अनेक दमदार मायलेज देणाऱ्या एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. तुम्हीही नवीन एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मारुती आणि टाटाच्या अनेक कार उपलब्ध आहेत.

0

Best Mileage SUV : देशातील ऑटो बाजारात एकापेक्षा एक दमदार मायलेज देणाऱ्या कार उपलब्ध आहेत. तसेच सध्या अनेक नवीन ग्राहक कार खरेदी करताना एसयूव्ही कारला सर्वात प्रथम प्राधान्य देत आहेत. त्यामुळे एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे.

तुम्हीही बाजारात उपलब्ध असलेल्या शानदार फीचर्स एसयूव्ही कार खरेदी करू शकता. या एसयूव्ही कार सर्वाधिक मायलेज देत आहेत. तसेच त्यांच्या किमती देखील कमी आहेत. त्यामुळे कमी बजेटमध्ये या एसयूव्ही कार खरेदी करू शकता.

टाटा Nexon, मारुती Fronx आणि ब्रेझा एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार असेल तर त्याआधी कोणती कार सर्वाधिक मायलेज देते हे जाणून घ्या. तसेच या एसयूव्ही कारपैकी कोणत्या कारमध्ये शक्तिशाली इंजिन दिले जात आहे हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे.

टाटा नेक्सॉन मायलेज

टाटा मोटर्सकडून त्यांची Nexon फेसलिफ्ट कार गेल्या काही दिवसांपूर्वीच लाँच केली आहे. Nexon चे पेट्रोल व्हेरियंट 17.01-17.44 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे. Nexon डिझेल AMT व्हेरियंट 23.23 Kmpl आणि 24.08 Kmpl मायलेज देते. त्यामुळे तुमच्यासाठी टाटा Nexon एसयूव्ही कार देखील चांगला पर्याय आहे.

मारुती सुझुकी ब्रेझा मायलेज

मारुती सुझुकी ब्रेझा कारमध्ये 1.5-लीटर चार-सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. Brezza एसयूव्ही कारचे मॅन्युअल व्हेरियंट Nexon कारपेक्षा जास्त मायलेज देते. Brezza मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंट 17.38 Kmpl मायलेज देते. Brezza चे ऑटोमॅटिक मॉडेल 19.80 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी Fronx मायलेज

मारुती सुझुकी Fronx एसयूव्ही कारमध्ये 1.2-लीटर चार-सिलेंडर, नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तसेच कारमध्ये 1.0-लीटर तीन-सिलेंडर टर्बोचार्ज्ड हा दुसरा इंजिन पर्याय देण्यात आला आहे. Fronx एसयूव्ही कारची दोन्ही इंजिन Nexon पेट्रोल एसयूव्ही कारपेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम आहे. मारुती सुझुकी Fronx कार 20 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.