Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Mileage SUV : मजबूत इंजिन आणि 21 kmpl मायलेजसह येतात या शानदार SUV, किंमत 10 लाखांपासून सुरु…

भारतीय ऑटो बाजारात अनेक दमदार मायलेज देणाऱ्या एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. तुम्हीही नवीन एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात मारुतीपासून टोयोटापर्यंतच्या एसयूव्ही उपलब्ध आहेत.

0

Best Mileage SUV : भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तसेच अनेक नवीन ग्राहक कार खरेदी करताना एसयूव्ही कारच खरेदी करत आहेत. एसयूव्ही कारच्या मागणीमुळे सेडान कारच्या मागणीत घेत झाली आहे.

तुम्हीही नवीन कार खरेदी करताना कमी किमतीत दमदार मायलेज देणारी एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी किआपासून टोयोटापर्यंतच्या अनेक एसयूव्ही कार उपलब्ध आहेत.

kia seltos

किआ कार उत्पादक कंपनीने त्यांची seltos कार अपडेटेड व्हर्जनमध्ये सादर केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारमध्ये 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 160hp पॉवर निर्माण करते. कारचे इंजिनला 6 स्पीड iMT किंवा 7-स्पीड DCT चा पर्याय देण्यात आला आहे. ही कार 17.8 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती ग्रँड विटारा/टोयोटा हायरायडर

मारुती सुझुकीची ग्रँड विटारा ही एसयूव्ही कार देखील दमदार मायलेज देते. या कारमध्ये 1.5 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तसेच टोयोटाच्या हायरायडर एसयूव्ही कारमध्ये देखील हेच इंजिन देण्यात आले आहे. या दोन्ही कार 21.12kmpl मायलेज देतात. दोन्ही कारचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

स्कोडा कुशाक

स्कोडा कुशाक कार देखील एसयूव्ही कारचा सर्वोत्तम पर्याय आहे. या कारमध्ये 1.5-लिटर, चार-सिलेंडर टर्बो पेट्रोल देण्यात आले आहे. हे इंजिन 150hp पॉवर जनरेट करते. कारच्या इंजिनला 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड डीसीटी गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला आहे. ही कार 17.83kmpl मायलेज देते.

फोक्सवॅगन Taigun

नवीन एसयूव्ही कार खरेदी करत असाल तर फोक्सवॅगन Taigun ही एसयूव्ही कार उत्तम पर्याय आहे. या कारमध्ये 1.5-लिटर, चार-सिलेंडर, टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड DCT चा पर्याय देण्यात आले आहे. ही कार 18.18kmpl मायलेज देते.