Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Petrol Mileage Cars In India : पेट्रोलवर जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही… खरेदी करा या शानदार मायलेज देणाऱ्या पेट्रोल कार, पहा यादी

भारतीय ऑटो बाजारात एकापेक्षा एक दमदार मायलेज देणाऱ्या कार उपलब्ध आहेत. तसेच अशा कारच्या किमती देखील खूपच कमी आहेत. या कार खरेदी करून तुम्ही इंधनावर पैशांची बचत करू शकता.

0

Best Petrol Mileage Cars In India : सध्या देशात एसयूव्ही कारची क्रेझ सुरु आहे. एसयूव्ही कारला ग्राहकांची प्रचंड मागणी आहे. त्यातच पेट्रोल एसयूव्ही कारचा अधिक ग्राहक पर्याय निवडत आहेत. या पेट्रोल कार सर्वोत्कृष्ट मायलेज देण्यास सक्षम आहेत.

तुम्हालाही शानदार मायलेज देणारी एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर बाजारात अनेक कंपन्यांच्या कार उपलब्ध आहेत. या कार 26.6 Kmpl पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहेत. तसेच त्यांच्या किमती देखील कमी आहेत.

खालील पेट्रोल कार शानदार मायलेज देतात

मारुती ग्रँड विटारा

मारुती सुझुकीची ग्रँड विटारा कार तुमच्यासाठी सर्वोत्तम कार आहे. ही कार फक्त पेट्रोल आणि हायब्रीड व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये पेट्रोल इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोटर देखील जोडण्यात आली आहे. कारमध्ये देण्यात आलेले इंजिन ७९ एचपी पॉवर आणि १४१ एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही कार 27.84 किमी प्रति लीटर मायलेज देते.

मारुती सेलेरियो

मारुती सुझुकीकडून नेहमीच स्वस्तात दमदार मायलेज देणाऱ्या कार सादर केल्या जात आहेत. त्यांची सेलेरियो ही कार तुमच्यासाठी उत्तम आहे. या कारमध्ये 998 सीसी तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

या कारमध्ये सीएनजी पर्याय देखील उपलब्ध आहे. या कारचे इंजिन ६७ पीएस पॉवर आणि ८९ एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड एएमटी गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. ही कार 26.6 किमी प्रति लीटर मायलेज देते.

होंडा सिटी

होंडा सिटी कारमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात येत आहे. हे इंजिन 6600rpm वर 119bhp आणि 4,300rpm वर 145Nm टॉर्क जनरेट करते. तसेच कारमध्ये हायब्रीड इंजिन पर्याय देखील देण्यात येत आहे. ही कार 26.5 किमी प्रति लीटर मायलेज देते. ही एक सर्वोत्तम मायलेज देणारी कार आहे.

मारुती वॅगनआर

मारुती सुझुकीची वॅगनआर कार तुमच्यासाठी शानदार पर्याय आहे. मारुतीकडून या कारची किंमत देखील अगदी कमी ठेवली आहे. तसेच कारमध्ये शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. 1 लिटर पेट्रोल, 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

कारमध्ये सीएनजी पर्याय देखील ऑफर करण्यात आला आहे. कारचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. ही कार 25.19 किमी प्रति लीटर मायलेज देते.