Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Resale Value Cars : भारतातील या आहेत टॉप 5 रिसेल व्हॅल्यू कार! नवीन कार खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या

नवीन कार खरेदी करत असताना अनेकजण त्या कार जुन्या झाल्यानंतर चांगली किंमत मिळेल का याचा विचार करून कार खरेदी करत असतात. भारतात अनेक अशा कार आहेत ज्यांना चांगली रिसेल व्हॅल्यू मिळत आहे.

0

Best Resale Value Cars : तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण नवीन कार खरेदी करताना ती पुन्हा विक्रीसाठी योग्य आहे का? तसेच त्या कार पुनर्विक्रीसाठी फायदेशीर ठरू शकतात का? हे पाहणे गरजेचे आहे.

भारतीय ऑटो बाजारात अशा अनेक कार आहेत ज्या पुनर्विक्रीसाठी सर्वोत्तम कार आहेत. अनेक लोक कारच्या पुनर्विक्री किमतीकडे अधिक लक्ष देत असतात. त्यामुळे ते पुनर्विक्रीसाठी योग्य अशा कारची निवड करत असतात.

खालील कारला चांगली रिसेल व्हॅल्यू मिळेल

मारुती सुझुकी डिझायर

मारुती सुझुकीच्या सर्वच कारला रिसेल व्हॅल्यू चांगली मिळत असते. मारुती सुझुकीकडून त्यांच्या कार अगदी कमी बजेटमध्ये सादर केल्या असल्या तरी त्या कार पुन्हा विक्रीसाठी चांगल्या आहेत. मारुतीची डिझायर सेडान कारला देखील चांगली रिसेल व्हॅल्यू मिळत आहे.

या कारची एक्स शोरूम किंमत 5.83 लाख रुपयांपासून सुरू होते. पहिल्या वर्षी जर तुम्ही ही कार विक्री करण्यासाठी काढली तर तुम्हाला कारच्या एकूण 86 टक्के पुनर्विक्री मूल्य मिळेल. चार वर्षानंतर या कारला 68 टक्के पुनर्विक्री मूल्य मिळेल.

Mauti Suzuki Swift

मारुती सुझुकी Swift ही सर्वाधिक विकली जाणारी सेडान कार आहे. या कारला देखील चांगली रिसेल व्हॅल्यू मिळत आहे. ही कार खरेदी केल्यानंतर १ वर्षात विक्रीसाठी काढली तर कारच्या एकूण किमतीच्या 78 टक्के रिसेल व्हॅल्यू मिळेल.

Mauti Suzuki Wagon R

मारुती सुझुकीच्या Wagon R कारला देखील चांगली रिसेल व्हॅल्यू मिळत आहे. तुम्ही नवीन कार खरेदी करत असताना Wagon R कारचा पर्याय निवडू शकता. ही कार सीएनजी आणि पेट्रोल व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. या कारची एक्स शोरूम किंमत ४.३४ लाख रुपयांपासून सुरू होते. कार खरेदी केल्यानंतर पहिल्या वर्षी विक्रीसाठी काढल्यास ८० टक्के रिसेल व्हॅल्यू मिळेल. तर चार वर्षानंतर 68 टक्के रिसेल व्हॅल्यू मिळेल

Toyota Innova

टोयोटा कार उत्पादक कंपनीच्या Innova कारला चांगली रिसेल व्हॅल्यू मिळत आहे. ही सर्वत्र लोकप्रिय कार म्हणून ओळखली जात आहे. तुम्हीही नवीन कार खरेदी करत असताना या कारचा पर्याय निवडू शकता. नवीन कार खरेदी केल्यानंतर पहिल्या वर्षी या कारची 90 टक्के तर चार वर्षानंतर 77 टक्के रिसेल व्हॅल्यू मिळेल.

ह्युंदाई i10

नवीन कार खरेदी करत असाल तर ह्युंदाई मोटर्सची i10 कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या कारला ग्रहांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतीय ऑटो मार्केटमधील ही एक सर्वित्तम हॅचबॅक कार आहे. या कारला देखील बाजारात चांगली रिसेल व्हॅल्यू मिळत आहे.