Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best Sedan Car : 6 लाखांच्या किमतीत येणाऱ्या सेडान कारची ग्राहकांना भुरळ! आतापर्यंत 25 लाख लोकांनी केली खरेदी, देते 34 Kmpl मायलेज

सध्या एसयूव्ही कारची मागणी जास्त असली तरी शानदार सेडान कारने विक्रीमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. या सेडान कारची आतापर्यत २५ लाख युनिट्स विकली गेली आहेत.

0

Best Sedan Car : देशातील ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या नवनवीन कार सादर केल्या जात आहेत. तसेच सध्या बाजारात एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मात्र मारुतीच्या सेडान कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

मारुती सुझुकी देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी आहे. दरवर्षी मारुतीच्या लाखो कार विक्री केल्या जातात. मारुतीकडून १५ वर्षांपूर्वी त्यांची एक आलिशान सेडान कार सादर करण्यात आली होती. आजही या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मारुती सुझुकी डिझायर कारला आजपर्यंत ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत २५ लाख लोकांनी ही आलिशान सेडान कार खरेदी केली आहे. उत्कृष्ट मायलेज आणि दमदार फीचर्समुळे ही कार अधिक लोकप्रिय झाली आहे.

मारुतीच्या डिझायर सेडान कारने आजपर्यंत २५ लाख युनिट्सचा आकडा पूर्ण केला आहे. मात्र कोणत्याही कंपनीच्या सेडान कारने आतापर्यंत १० लाख युनिट्स विक्रीचा आकडाही पार केलेला नाही. त्यामुळे मारुती सुझुकी पुन्हा एकदा सर्वाधिक सेडान कार विक्री करणारी कंपनी बनली आहे.

कंपनीचे सीईओ, मार्केटिंग आणि सेल्स शशांक श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितले की, कंपनीचे अद्ययावत तंत्रज्ञान, उत्तम वैशिष्ट्ये आणि नवीन डिझाइनसह दर्जेदार उत्पादने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. डिझायर ही कंपनीची एक उत्तम कार आहे आणि ग्राहकांनी तिच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. 25 लाख ग्राहकांची मने जिंकणे ही महत्त्वाची कामगिरी असल्याचे ते म्हणाले.

2008 मध्ये लॉन्च करण्यात आली

मारुती सुझुकीकडून डिझायर सेडान कार 2008 मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. लॉन्च होताच या कारने पहिल्या वर्षात 1 लाखांचा विक्रीचा टप्पा पार केला होता. 2012-13 या साली कंपनीने 5 लाख युनिट्सचा टप्पा पार केला, 2015-16 साली 10 लाख युनिट्स, 2017-18 मध्ये 15 लाख युनिट्स आणि 2019-20 मध्ये 20 लाख युनिट्सच्या विक्रीचे आकडे गाठले.

शक्तिशाली इंजिन आणि उत्कृष्ट मायलेज

मारुती सुझुकी डिझायरमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तसेच ही कार सीएनजी पर्यायांमध्ये देखील ऑफर करण्यात आली आहे. डिझायर कार पेट्रोल मोडमध्ये २५ किमी प्रति लिटर आणि सीएनजीवर ३४ किमी प्रति किलो मायलेज देण्यास सक्षम आहे.

किंमत देखील कमी

मारुती सुझुकीच्या डिझायर सेडान कारच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6.52 लाख रुपये आहे तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 9.39 लाख रुपये आहे. त्यामुळे ही कार तुमच्यासाठी देखील कमी बजेटमध्ये उत्तम पर्याय आहे.