Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best SUV Cars : रस्त्यांवर धावणाऱ्या ‘ह्या’ आहे सर्वात भारी SUV कार्स; लिस्ट पाहून वाटेल आश्चर्य

0

Best SUV Cars : बाजारात सध्या एसयूव्ही कार खरेदीचा एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. भारतीय ऑटो बाजारात आज ग्राहक मोठ्या प्रमाणात जास्त ग्राउंड क्लीयरन्ससह येणाऱ्या एसयूव्हींना खरेदीस प्राधान्य देत आहे.

यातच जर तुम्ही देखील जास्त ग्राउंड क्लीयरन्ससह येणारी एसयूव्ही खरेदीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. या लेखात आम्ही तुम्हाला जास्त ग्राउंड क्लीयरन्ससह येणाऱ्या एसयूव्हीबद्दल महिती देणार आहोत ज्यांना तुम्ही अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया या एसयूव्ही कार्सबद्दल संपुर्ण माहिती.

Mahindra Thar
कंपनीची ही एसयूव्ही देशातील बाजारपेठेत चांगलीच लोकप्रिय आहे. सध्या कंपनी आपले 3 डोअर व्हेरियंट बाजारात विकत आहे. त्याच्या ग्राउंड क्लीयरन्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला 226 मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. देशातील बाजारपेठेत त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.5 लाख रुपये आहे.

Tata Nexon
ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे. त्याच्या ग्राउंड क्लीयरन्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला 209 mm चा ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. देशातील बाजारपेठेत त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.8 लाख रुपये आहे.

Kia Sonet
कंपनीची ही एसयूव्ही तिच्या जबरदस्त डिझाइन आणि पॉवरफुल इंजिनमुळे बाजारात चांगलीच पसंतीस उतरली आहे. त्याच्या ग्राउंड क्लीयरन्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला 205 मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. देशातील बाजारपेठेत त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.79 लाख रुपये आहे.

Maruti Brezza
कंपनीच्या या SUV च्या ग्राउंड क्लिअरन्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 198 mm चा ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. देशातील बाजारपेठेत त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.29 लाख रुपये आहे.

Renault Kiger
कंपनीच्या या SUV च्या ग्राउंड क्लीयरन्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 205 mm चा ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. देशातील बाजारपेठेत त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.5 लाख रुपये आहे.