Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best SUV Waiting Periods : 30 Kmpl मायलेज देणाऱ्या या ३ बेस्ट SUV साठी करावी लागणार इतकी प्रतीक्षा, पहा प्रतीक्षा कालावधी

नवीन एसयूव्ही कार खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला त्याअगोदर कारचा प्रतीक्षा कालावधी जाणून घेयला लागेल. कारण एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने प्रतीक्षा कालावधी देखील वाढला आहे.

0

Best SUV Waiting Periods : भारतीय ऑटो मार्केटमध्ये सध्या वाहनांच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच एसयूव्ही कारची क्रेझ सध्या सुरु आहे. अनेक ग्राहकांचा एसयूव्ही कार खरेदीकडे कल असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एसयूव्ही कारच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये देखील वाढ होत आहे.

देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. या काळात तुम्हीही नवीन एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात प्रथम कारचा प्रतीक्षा कालावधी जाणून घेणे गरजेचे आहे.

दिवाळी किंवा नवरात्रीमध्ये एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फार कठीण आहे. कारण एसयूव्ही कारच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये 7 ते 8 महिन्यांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे आता एसयूव्ही कार बुक केल्यानंतर तुम्हाला 7 ते 8 महिन्यात ती मिळू शकते.

टाटा पंच, मारुती Fronx आणि ह्युंदाई Exter यापकी एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार असेल तर तुम्हाला त्याअगोदर त्या कारचा प्रतीक्षा कालावधी आणि किंमत जाणून घेणे गरजेचे आहे.

ह्युंदाई Exter

ह्युंदाई Exter एसयूव्ही अलीकडेच भारतीय ऑटो बाजारात लॉन्च केली आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कारच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये देखील वाढ झाली आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपये आहे.

ह्युंदाई Exter एसयूव्ही लॉन्च झाल्यापासून कारला 750000 पेक्षा जास्त बुकिंग मिळाले आहेत. या कारचा खरेदीसाठी प्रतीक्षा कालावधी 8 महिन्यांवर पोहोचला आहे. डिलरशिप आणि रंग पर्यायावर कारचा प्रतीक्षा कालावधी वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे जवळच्या डिलरशिपला भेट देऊन तुम्ही याबाबत माहिती घेऊ शकता.

टाटा पंच

टाटा मोटर्सकडून त्यांची पंच एसयूव्ही कार नुकतीच सीएनजी व्हर्जनमध्ये लॉन्च केली आहे. तसेच आता लवकरच पंच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये पाहायला मिळू शकते. पंच कार लॉन्च झाल्यापासून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद या कारला मिळत आहे.

कारचा प्रतीक्षा कालावधी 6 आठवडे आहे. तसेच सणासुदीच्या काळात कारचा प्रतीक्षा कालावधी आणखी वाढू शकतो. या कारची एक्स शोरूम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरु होते. कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

मारुती फ्रॉन्क्स

मारुती सुझुकीची फ्रॉन्क्स एसयूव्ही कार तुमच्यासाठी स्वस्तात मस्त एसयूव्ही पर्याय आहे. ही कार खरेदीसाठी देखील तुम्हाला प्रतीक्षा करावी लागू शकते. या कारची किंमत 7.46 लाख रुपये एक्स शोरूम आहे. ही कार खरेदीसाठी ग्राहकांना 24 आठवडे प्रतीक्षा करावी लागू शकते. कारमध्ये 1.2-लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1-लीटर टर्बो पेट्रोल बूस्टरजेट इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे.

वरील तीनही एसयूव्ही कारचे सीएनजी मॉडेल 25 ते 30 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहेत. तर पेट्रोल मायलेज प्रत्येक कारचे वेगवेगळे आहे. त्यामुळे या एसयूव्ही कारचे सीएनजी मॉडेल तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.