Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Best SUVs In India : ब्रेझाच्या किमतीत येतात या जबरदस्त सुरक्षा फीचर्स SUVs, Nexon आणि XUV300 चा समावेश

ब्रेझा एसयूव्ही कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी या कारपेक्षा सर्वोत्तम पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. या कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देण्यात येत आहेत.

0

Best SUVs In India : देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या शानदार एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. मारुती सुझुकी ब्रेझा एसयूव्हीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र ब्रेझा एसयूव्हीच्या किमतीमध्ये तुम्ही जबरदस्त सुरक्षा फीचर्स असलेल्या एसयूव्ही कार खरेदी करू शकता.

मारुती सुझुकी ब्रेझा देशातील लोकप्रिय एसयूव्ही कार आहे. या कारला दरमहा चांगली मागणी आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.29 लाख रुपये आहे. मात्र याच किमतीमध्ये या कारपेक्षा जास्त सुरक्षित कार खरेदी करू शकता.

ह्युंदाई Venue

ह्युंदाई मोटर्सची Venue एसयूव्ही कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. कारमध्ये लेव्हल 1 ADAS सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहे. कारची एक्स शोरूम किंमत 7.89 लाख रुपये आहे. Venue च्या SX(O) ADAS व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 12.44 लाख रुपये आहे.

टाटा नेक्सॉन

टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांच्या Nexon एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केले आहे. कारमध्ये 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.10 लाख रुपये आहे.

किआ सोनेट

किआ कार कंपनीची सोनेट एसयूव्ही कार देखील तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. लवकरच कंपनीकडून फेसलिफ्ट मॉडेल भारतात सादर केले जाणार आहे. सध्याच्या कारमध्ये 1.2-लीटर NA पेट्रोल इंजिन, 1.0-लीटर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन देण्यात येत आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.79 लाख रुपये आहे.

महिंद्रा XUV300

महिंद्रा कार कंपनीने त्यांच्या अनेक शक्तिशाली कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. XUV300 एसयूव्ही कार देखील ब्रेझा एसयूव्हीपेक्षा उत्तम पर्याय आहे. कारमध्ये 1.5-लीटर टर्बो डिझेल, 1.2-लीटर पेट्रोल आणि 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.99 लाख रुपये आहे.