Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Bike Comparison : Himalayan 450 की Yezdi Adventure कोणती आहे बेस्ट ऑफ रोडींग बाईक? पहा किंमत आणि फीचर्स

ऑफ रोडींग बाईक खरेदी करताना तुम्ही देखील Himalayan 450 आणि Yezdi Adventure बाईकचा पर्याय निवडला असेल तर त्याआधी कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे ते जाणून घ्या.

0

Bike Comparison : आजकाल तरुणांमध्ये नवीन बाईक खरेदी करताना ऑफ रोडींग बाईक खरेदी करण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे. भारतीय दुचाकी मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या उत्तम दुचाकी बाईक उपलब्ध आहेत. तसेच आणखी नवीन शक्तिशाली इंजिन असलेल्या बाईक देखील सादर करण्यात येत आहेत.

Royal Enfield कडून अलीकडेच त्यांची ऑफ रोडींग बाईक Himalayan 450 शक्तीशाली इंजिनसह लॉन्च केली आहे. ही बाईक दुचाकी मार्केटमध्ये Yezdi Adventure बाईकची स्पर्धा करते.

तुम्हालाही नवीन ऑफ रोडींग बाईक खरेदी करायची असेल तर Yezdi Adventure की Himalayan 450 या दोन बाईकपैकी कोणती बाईक उत्तम आहे ते जाणून घ्या.

Himalayan 450 Vs Yezdi Adventure किंमत

रॉयल एनफिल्डकडून लाँच करण्यात आलेल्या Himalayan 450 बाईकची एक्स शोरूम किंमत 2.69 लाख रुपयांपासून सुरू होते. तर Yezdi Adventure बाईकची एक्स शोरूम किंमत 2.16 लाख रुपयांपासून सुरू होते. Himalayan 450 बाईकपेक्षा Yezdi Adventure बाईक स्वस्त आहे.

Himalayan 450 Vs Yezdi Adventure डिझाईन

दोन्ही बाईकला आकर्षक डिझाईन देण्यात आले आहे. दोन्ही बाईकमध्ये मोठ्या इंधन टाकी, विंडस्क्रीन, वर्तुळाकार एलईडी हेडलॅम्प, अप-स्वीप्ट एक्झॉस्ट आणि स्प्लिट सीट सेटअपसह बाजारात सादर करण्यात आल्या आहेत.

Himalayan 450 Vs Yezdi Adventure वैशिष्ट्ये

Himalayan 450 बाईकमध्ये रॉयल एनफिल्डकडून सर्व LED लाइटिंग, राइडिंग मोड, राइड-बाय-वायर, स्विच करण्यायोग्य ABS, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नवीन TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच Yezdi Adventure बाईकमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, सर्व एलईडी लाइटिंग अशी वैशिष्ट्ये दिली आहेत.

Himalayan 450 Vs Yezdi Adventure इंजिन

रॉयल एनफिल्डने त्यांच्या नवीन Himalayan 450 बाईकमध्ये 451.65 सीसी इंजिन दिले आहे. जे 40 bhp पॉवर आणि 45 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच Yezdi Adventure बाईकमध्ये 334 सीसी इंजिन दिले आहे जे 30.2 bhp पॉवर आणि 29.9 टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.