Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Bike Servicing Tips : मस्तच ! या टिप्स फॉलो करून घरबसल्या करा बाइक सर्व्हिसिंग, होईल आर्थिक फायदा

0

Bike Servicing Tips : भारतात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे अनेकांना पेट्रोल बाईकची सर्व्हिसिंग करणे न परवडण्यासारखे झाले आहे. महागाई वाढत असली तरी बाईकच्या मागणीत देखील झपाट्याने वाढ झाली आहे.

बाईक सर्व्हिसिंग करण्यासाठी देखील जास्त पैसे लागत आहेत. तुम्हालाही बाईक सर्व्हिसिंगचे पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही घर बसल्या बाईक सर्व्हिसिंग करू शकता. यासाठी तुम्हालाही काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.

आजही अनेकजण बाईकने प्रवास करण्यास सर्वात प्रथम प्राधान्य देत आहेत. कारण बाईक मायलेजच्या बाबतीत सर्वोत्तम आहेत. बाईकने प्रवास केल्यानंतर इंधनावर जास्त पैसे देखील खर्च करावे लागत नाहीत.

अनेकदा काहींना व्यस्त कामामुळे बाईकची सर्व्हिसिंग वेळेवर करणे शक्य होत नाही. बाईक वेळेवर सर्व्हिसिंग न केल्याने त्याचा परिणाम बाईकच्या मायलेजवर होतो. त्यामुळे तुम्ही घरबसल्या देखील खालील टिप्स फॉलो करून बाईक सर्व्हिसिंग करू शकता.

घरच्या घरी बाईक सर्व्हिसिंग करताना या गोष्टी लक्षात घ्या.

ऑइल बदला

तुमची बाईक कोणत्या कंपनीची आहे आणि त्यामध्ये किती शक्तिशाली इंजिन आहे यावर बाईकला किती ऑइल आवश्यक आहे हे लिहलेले असते. बाइकच्या सर्व्हिस बुकलेटवरही ही माहिती उपलब्ध असते.

बाईकच्या इंजिनखाली एक ऑइल नट दिलेला असतो जो काढल्यानंतर बाईकचे सर्व जुने ऑइल बाहेर येईल. सर्व ऑइल बाहेर आल्यानंतर काढलेला नट बसवा आणि पुन्हा नवीन ऑइल भरा.

चेन स्वच्छ करा

बाईकच्या चेनवर सर्व्हिसिंग करताना सतत ऑइल सोडले जाते. त्यामुळे त्यावर सतत धूळ बसत असते. चेन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही रॉकेल किंवा डिझेलचा वापर करू शकता.

ब्रशच्या मदतीने तुम्ही बाईकची चेन स्वच्छ करू शकता. स्वच्छ झाल्यानंतर तुम्ही पुन्हा चेनवर ग्रीस लावू शकता. चेनवर जास्त ग्रीस लागू नये याची देखील तुम्ही काळजी घ्या.

डिस्क ब्रेकची काळजी घ्या

तुमच्या बाईकला देखील डिस्क ब्रेक असतील तुम्हाला सर्व्हिसिंगवेळी डिस्क ब्रेकच्या ऑइलची पातळी तपासणे गरजेचे आहे. जर डिस्क ब्रेकच्या ऑइलची पातळी कमी असेल तर त्यामध्ये ऑइल भरा.