Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

संधी चुकवू नका! अवघ्या 1 लाखात घरी आणा Maruti Suzuki Fronx ; जाणून घ्या धमाकेदार ऑफर

मागच्या महिन्यात Maruti Suzuki Fronx सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्ही कारपैकी एक आहे. कंपनीकडून या कारमध्ये 5 जणांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बाजारात ही कार 12 व्हेरियंट आणि 5 ट्रिम लेव्हलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

0

Maruti Suzuki Fronx : देशातील सर्वात मोठी ऑटो कंपनी मारूती सुझुकीने काही दिवसापूर्वी मोठा धमाका करत एक नवीन एसयूव्ही कार बाजारात लाँच केली होती. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या ही कार बाजारात धुमाकूळ घालत आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो मारुती सुझुकीने काही दिवसापूर्वी Maruti Suzuki Fronx ही एसयूव्ही कार बाजारात लाँच केली होती. मागच्या महिन्यात Maruti Suzuki Fronx सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्ही कारपैकी एक आहे. कंपनीकडून या कारमध्ये 5 जणांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच बाजारात ही कार 12 व्हेरियंट आणि 5 ट्रिम लेव्हलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

ग्राहकांना मारुती सुझुकी या कारमध्ये दमदार मायलेज तसेच बेस्ट फीचर्स आणि पॉवरफुल इंजिनही ऑफर करत आहे. यामुळे जर तुम्ही ही कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही आज एक जबरदस्त फायनान्स प्लॅन घेऊन आलो आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी अवघ्या 1 लाखात ही मस्त कार घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया या मस्त आणि सर्वात भारी फायनान्स प्लॅनबद्दल संपूर्ण माहिती.

Maruti Suzuki Fronx  फायनान्स प्लॅन

आता जर तुम्हाला मारुती सुझुकी फ्रँक्सचे बेस मॉडेल फ्रँक्स सिग्मा विकत घ्यायचे असेल तर या कारची ऑन-रोड किंमत 8,37,661 रुपये आहे. जर तुम्ही मारुती फ्रँक्स सिग्मा व्हेरियंटला रु. 1 लाख डाउनपेमेंटनंतर फायनान्स केले तर तुम्हाला रु. 7,37,661 कर्जाची रक्कम मिळेल. 5 वर्षांचा कर्जाचा कालावधी आणि 9 टक्के व्याजदर गृहीत धरल्यास, तुम्हाला पुढील 60 महिन्यांसाठी मासिक हप्ता म्हणून 15,313 रुपये भरावे लागतील. या कारसाठी तुम्हाला सुमारे 1.8 लाख रुपये व्याज द्यावे लागेल.

दुसरीकडे जर तुम्ही मारुती सुझुकी फ्रँक्सच्या डेल्टा मॅन्युअल व्हेरियंटला वित्तपुरवठा केला तर त्याची ऑन-रोड किंमत रु. 9,31,924 आहे. आता जर तुम्ही 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटसह वित्तपुरवठा केला तर तुम्हाला 8,31,924 रुपयांचे कर्ज मिळेल. तुम्ही 9% व्याजदराने 5 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास तुम्हाला पुढील 60 महिन्यांसाठी 17,269 रुपये EMI म्हणून भरावे लागतील. या कारसाठी तुम्हाला 2 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज द्यावे लागेल.

Maruti Suzuki Fronx  इंजिन

कंपनीने या कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन मजबूत पावर निर्माण करण्यास देखील सक्षम आहे. तसेच याला 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. मायलेजबद्दल बोलताना कंपनीचा दावा आहे की ही कार तुम्हाला सुमारे 22.89 किमी प्रति लीटर मायलेज देण्यास सक्षम आहे.

 

Maruti Suzuki Fronx  किंमत

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7.46 लाख रुपये ठेवली आहे. त्याच वेळी त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 13.13 लाख रुपये खर्च करावे लागतील.